शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्यला जवळपास फायनल? काँग्रेसला सर्वाधिक तर ठाकरे आणि पवारांना एवढ्या जागा 
2
निलेश राणे शिवसेनेतून निवडणूक लढणार? उदय सामंत म्हणाले, "जर उमेदवारी दिली तर..."
3
विनेश फोगाटच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी मैदानात; म्हणाल्या- 'ही दुष्टांविरोधातील लढाई...'
4
साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आले एकत्र; अजित पवारही सोबत, कारण काय?
5
प्रशांत किशोर यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश; आज केली 'जन सुराज' पक्षाची अधिकृत घोषणा
6
BSNL ची मोठी घोषणा; ग्राहकांना स्वस्त 4G स्मार्टफोन देणार, 'या' कंपनीसोबत केला करार
7
इस्रायलचा हिजबुल्लाहच्या मुख्यालयासह १५० ठिकाणांवर हल्ला, अनेक दहशतवादी ठार
8
"देशाचे राष्ट्रपिता नाही तर सुपुत्र असतात’’, गांधी जयंती दिवशी कंगना राणौतच्या पोस्टमुळे नवा वाद
9
हिज्बुल्लाविरोधात जमिनी कारवाईत इस्रायलला पहिला झटका, लेबनानमध्ये एका कमांडरचा मृत्यू
10
“अमित शाह यांना दररोज नमस्कार केला पाहिजे”; चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कारण
11
Video: जपानच्या विमानतळावर अमेरिकन बॉम्बचा अचानक स्फोट, ८७ विमान उड्डाणे रद्द
12
X युजर्सना यापुढे 'ही' सुविधा मिळणार नाही; इलॉन मस्क यांनी केली घोषणा, काय बदलले? पाहा...
13
Harbhajan Singh, IPL 2025 Auction: ना विराट, ना रोहित... 'या' भारतीयावर IPLमध्ये लागेल ३०-३५ कोटींची बोली; भज्जीचा मोठा दावा
14
ठाण्यात चिप्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु
15
"तुमच्या हातचा स्वादिष्ट...", नीरज चोप्राच्या आईला PM मोदींचे पत्र; आभार मानताना भावुक
16
"मध्यपूर्वेचा नकाशा बदलण्याची इस्रायलला संधी...", विरोधकांकडून नेतन्याहूंना मिळाला ग्रीन सिग्नल! 
17
Bumrah Ashwin Virat Rohit, ICC test Rankings: जसप्रीत बुमराह 'नंबर १'! कसोटी क्रमवारीत विराट, यशस्वीची मोठी झेप; रोहित, पंत, गिलची घसरण
18
ठाण्यात जेसीबीच्या धक्क्याने महानगर गॅस वाहिनीला गळती, ५०० ग्राहकांचा गॅस पुरवठा खंडीत
19
"...मग मनोज जरांगेंनी आधी तिथला उमेदवार जाहीर करावा", लक्ष्मण हाकेंचे चॅलेंज काय?
20
याला म्हणतात परतावा...! TATA च्या या शेअरनं ₹1 लाखाचे केले ₹54 लाख; दमानींकडे तब्बल 4500000 शेअर

चारचाकी वाहन उलटले; महिला डॉक्टरसह दोन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 10:25 AM

डॉ. ऐश्वर्या गुजराती यांच्या हाता-पायाला गंभीर दुखापत झाली असून, भाऊ गौरव यालासुद्धा छातीला मार लागला आहे.

मूर्तिजापूर : भरधाव चारचाकी वाहन उलटल्याने महिला डॉक्टरसह दोन जण जखमी झाले. ही घटना राष्ट्रीय महामार्गावरील जामठी फाटानजीक २३ एप्रिल रोजी घडली. यातील एक जण गंभीर जखमी जखमी आहे.बाळापूर येथील रहिवासी डॉ. ऐश्वर्या गुजराती (२३) या अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात आपल्या कर्तव्यावर हजर होण्यासाठी त्यांचा लहान भाऊ गौरव गुजराती (२१) याच्या समवेत एमएच ३०-११७८ या वाहनाने जात होते. दरम्यान, जामठी फाट्याजवळ वाहनाचे अचानक टायर फुटल्याने गाडी उलटली. या अपघातात डॉ. ऐश्वर्या गुजराती यांच्या हाता-पायाला गंभीर दुखापत झाली असून, भाऊ गौरव यालासुद्धा छातीला मार लागला आहे. गाडीचा चालक अनिल दिगंबर शिजोळे यालासुद्धा दुखापत झाली आहे. अपघात होताच आजूबाजूच्या नागरिकांनी जखमींना त्वरित बाहेर काढून १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतून अकोला येथे एका खासगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले आहे. या घटनेमध्ये उलटलेल्या वाहनाचा चुराडा झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने मोठा अनर्थ टळला. (शहर प्रतिनिधी)

टॅग्स :AkolaअकोलाMurtijapurमुर्तिजापूरAccidentअपघात