शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
2
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: मित्रांकडून लाभ होईल, मंगल कार्याची सुरूवात करू शकता!
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मनसेमुळे आघाडीला ८ जागी बसला फटका; शिंदेसेनेमुळे मनसेचे ३ प्रमुख उमेदवार पराभूत
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मुंबईत भाजपच नंबर वन, ३६ पैकी १६ जागांवर दणदणीत विजय; उद्धवसेनेपुढे मोठं आव्हान
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: विधानसभेत महिलांचा आवाज बुलंद केव्हा होणार?; महामुंबईत फक्त ८ महिला आमदार
7
मंत्रिपदांसाठी अनेक नावांची चर्चा; महामुंबई परिसरातून इच्छुकांमध्ये जबरदस्त रस्सीखेच
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उद्धवनी मुंबई राखली, मात्र काँग्रेसचा पीळ सुटत नाही; नेत्यांची खदखद बाहेर पडली
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: पालघरमधील ‘ठाकूर’शाही संपुष्टात आली?; कथित पैसे वाटपाच्या गोंधळाने नुकसानच झालं
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अल्पसंख्याक बहुल मतदारसंघात काय घडले?; १३ पैकी ६ आमदार निवडून आले
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ठाणे जिल्ह्यात भाजपा शिवसेनेवर भारी; महापालिकेच्या अतिरिक्त जागा भाजप मागेल का?
12
तुमच्या वाहनासाठी आवडीचा क्रमांक घरबसल्या मिळवा; आरटीओची आजपासून ऑनलाइन सुविधा
13
..त्या काळाची फार आठवण येते; ही निवडणूक आणि राजकारणाचा ‘तो’ जमाना
14
हेमंत सोरेन २८ ला घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ; पत्नी कल्पना यांनाही बनविणार मंत्री
15
आज यशवंतरावांनी शरद पवारांना काय सल्ला दिला असता?
16
दोन ध्रुव अन् दोन आघाड्या..! प्रादेशिक अस्मिता जपणारे राजकारण सोपे राहिले नाही
17
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
18
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
19
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
20
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?

जिल्हा परिषदेचे चार कर्मचारी रडारवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 4:38 PM

शोध मोहिमेत वित्त व शिक्षण विभागाचे मिळून ४ कर्मचारी कारवाईच्या रडारवर आहेत.

अकोला : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अनुसूचित जमातींची जातवैधता नसलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना आता सेवेतून कमी केले जाणार आहे. त्यासाठी राबवलेल्या शोध मोहिमेत वित्त व शिक्षण विभागाचे मिळून ४ कर्मचारी कारवाईच्या रडारवर आहेत. तर जिल्हा परिषदेने फेब्रुवारी २०१९ मध्ये बडतर्फ केलेल्या सर्वच कर्मचाऱ्यांची प्रकरणे न्यायप्रविष्ट असल्याने त्यांच्याबाबतचा निर्णय न्यायालयाच्या आदेशानंतर घेतला जाईल, असे समिती प्रमुख उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूरज गोहाड यांनी सांगितले आहे.बोगस जात प्रमाणपत्राचा वापर करून नोकरी आणि शैक्षणिक पदवी मिळविणाºयांच्या अधिकारी-कर्मचाºयांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने नुकताच कारवाई करण्याचा आदेश दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अनुसूचित जमातींसाठी राखीव जागांवर नोकरी प्राप्त करणाºयांची जातवैधता प्राप्त करून घेणे, त्याची सत्यता पडताळणी तातडीने करण्याचा आदेश राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने दिला. त्यानुसार शासकीय सेवेत राखीव जागेवर नियुक्ती प्राप्त झालेले तसेच जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी सातत्याने आवाहन करूनही ते प्रमाणपत्र सादर न करणाºयांना ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत संबंधित दस्तऐवज दाखल करणे बंधनकारक आहे. जिल्हा परिषदेतील अधिकारी-कर्मचाºयांची जातवैधता प्रमाणपत्रे प्राप्त आहेत की नाही, त्याची सत्यता पडताळणी करण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूरज गोहाड यांच्याकडे दिली. त्यासाठी विशेष मोहीम राबवून काम पूर्ण करण्याचे शासनाने बजावले आहे. विशेष म्हणजे, यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी स्वत:ची कागदपत्रे सादर करून सुरुवात केली.या समितीकडून जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर सर्वच संवर्गात अनुसूचित जमातींसाठी राखीव जागांवर नियुक्त अधिकारी-कर्मचाºयांची माहिती गोळा करण्यात आली. त्यांच्याकडून नियुक्तीबाबतची संपूर्ण कागदपत्रे, जातवैधता प्रमाणपत्रेही घेतली. ठरलेल्या मुदतीत ही कागदपत्रे सादर न करणाºयांमध्ये वित्त विभागाच्या एका कर्मचाºयासह शिक्षण विभागातील मराठी माध्यमाचा एक शिक्षक व उर्दू माध्यमातील दोन अशा चौघांचा समावेश आहे.अकरा महिन्याचा आदेश मिळणारतीन शिक्षक व एका कर्मचाºयाला यापुढे ११ महिने सेवा कालावधीचा आदेश दिला जाणार आहे. दरम्यान, त्यांनी जातवैधतेची पूर्तता केल्यास कारवाईबाबत पुढील निर्णय घेतला जाईल. तर त्यांच्या पदावर नियुक्तीसाठी भरती प्रक्रियाही राबवली जात आहे. त्यासाठी चार पदांच्या थेट भरतीची जाहिरातही लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद