लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोला- हैदराबाद राष्ट्रीय चौपदरी महामार्ग (एनएच १६१) निर्मितीच्या हालचालींना वेग आला असून, आगामी २०१८ च्या मार्च अखेरपर्यंत बांधकामाच्या निविदा निघण्याचे संकेत आहेत. महाराष्ट्र आणि तेलंगणा या दोन राज्यांना जोडणाºया चौपदरी मार्गामुळे या मार्गांवरील गावांचा दळण-वळणाच्या व्यावसायिक दृष्टीने विकास होणार आहे.अकोला- पातूर-वाशिम- हिंगोली-नांदेड-डिगलूर-सांगारेड्डी या तेलंगणा राज्यापर्यंतच्या राष्ट्रीय महामार्गाचे वर्षभरापूर्वीच डांबरीकरण झाले. देशातील दळणवळणाचे जाळे अधिक विकसित करण्याच्या दृष्टीने अकोला- हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. त्या दिशेने हालचाली सुरू झाल्या आहेत. अकोल्यापासून संगारेड्डीपर्यंत ४३० किलोमीटर अंतराचा चौपदरी मार्गाच्या निर्मितीसाठी डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट तयार झाला आहे. ही जबाबदारी राज्य महामार्ग राष्ट्रीय बांधकाम विभागाकडे दिली होती. एका वर्षाआधीच हा महामार्गाचे डांबरीकरण राज्याच्या बांधकाम विभागाने केले असून, अजून या मार्गाच्या देखभालीची जबाबदारी अकोला महामार्ग मंडळाकडेच आहे. राष्ट्रीय राज्य महामार्गाकडे अजून जायची आहे. त्यानंतर निविदा निघतील, अन् दोन वर्षांच्या आत या चौपदरीकरणास सुरुवात होईल, अशी माहिती अमरावतीचे राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता ब्राह्मणकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. दरम्यान, प्राथमिक मोजणीच्या थ्रीडी नोटिफिकेशनसाठी, अकोला-बाळापूरचे उपविभागीय महसूल अधिकाºयांनी कार्यवाही सुरू केली आहे. चौपदरी महामार्गची मोजणी करण्यासाठी रक्कम भरणे, भूसंपादनासाठीची माहिती घेण्याचे काम सुरू झाले आहे.या जिल्ह्यांतून जाईल चौपदरी मार्गमहाराष्ट्रातील अकोला, वाशिम, हिंगोली, नांदेड आणि तेलंगणातील कामरेड्डी, संगारेड्डी या सहा जिल्ह्यांतून राष्ट्रीय चौपदरी महामार्ग जाणार आहे. ज्या गावातून हा महामार्ग जाणार आहे, त्या लगतच्या गावांना आणि संबंधित जिल्ह्यांना दळणवळणचा आणि पर्यायाने व्यापाराचा मोठा फायदा होण्याचे संकेत आहेत.अकोला- हैदराबाद राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या प्रत्यक्ष कामाला मार्च अखेरपर्यंत सुरुवात होण्याची शक्यता आहे. तेथून दीड-दोन वर्षांच्या आत मार्ग तयार होण्याची शक्यता आहे. या कामाची पुढची जबाबदारी अमरावतीच्या राष्ट्रीय राज्य महामार्गाकडे सोपविली जाणार आहे.- रावसाहेब झाल्टे,कार्यकारी अभियंता राज्य महामार्ग, सार्वजनिक बांधकाम मंडळ अकोला.
अकोला-हैदराबाद राष्ट्रीय चौपदरी महामार्ग निर्मितीच्या हालचालींना वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 12:23 AM