लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : हरिहरपेठेतील रहिवासी तथा कुख्यात गुंड विकास ऊर्फ विक्की अशोक खपाटे (३२) याच्या खूनप्रकरणी शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने पाटील यांच्या पथकाने चौथा आरोपी रोशन सुधाकर ताकवाले यास बुधवारी अटक केली. या प्रकरणातील तीन आरोपी आधीच अटक असून, ते न्यायालयीन कोठडीत आहेत.हरिहरपेठेतील गाडगेनगरातील रहिवासी विकास खपाटे हा गुंड प्रवृत्तीचा असून, त्याच्यावर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. दोन वर्षांपूर्वी दुर्गोत्सवादरम्यान त्याने योगेश चव्हाण नामक युवकाची हत्या केली होती. या हत्या प्रकरणातून त्याची न्यायालयाने निर्दोष सुटका केली होती. विक्की खपाटे हा व्याजाने पैसे देण्याचा व्यवसाय करीत होता. खपाटे हा गाडगेनगरात असताना सोमवार, २६ जून रोजी दुपारी त्याच्यावर धारदार कुऱ्हाड व लोखंडी पाइपने हल्ला झाला होता. रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी जुने शहर पोलिसांनी चेतन साहू, करण साहू, नितीन साहू आणि राजू काटोलेसह आणखी काही जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करत करण साहू, नितीन साहू, राजू काटोले तिघांना अटक केली. बुधवारी चौथा आरोपी रोशन सुधाकर ताकवाले यास अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील आणखी काही आरोपी फरार आहेत.
विक्की खपाटे खुनातील चौथा आरोपी अटकेत
By admin | Published: July 13, 2017 12:57 AM