खामगाव, दि. २६- मॅनेजर असल्याची बातावणी करुन शेतकर्याच्या एटीएममधून ३0 हजार रूपये काढून शेतकर्याची फसवणूक केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. तालुक्यातील पिंप्री देशमुख येथील ईश्वर भगवान अंभोरे (वय ३२) यांना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास अज्ञात इसमाने सिंडीकेड बँकेतून शाखा व्यवस्थापक बोलत असल्याचे भासवून बंद पडलेले एटीएम कार्ड सुरू करण्याकरीता एटीएम व अकाऊंट नंबर मागितला. त्यानंतर बुधवारी ईश्वर अंभोरे यांनी खामगाव येथील सिंडीकेड बँकेत चौकशी केली असता त्यांच्या खात्यातून ३0 हजार रूपये लंपास झाल्याचे उघडकीस आले. सिंडीकेड बँकेतून कोणीही एटीएम कार्डबाबत फोन केला नसल्याचे सांगण्यात आले. याबाबत शेतकर्याने पोलिसात तक्रार दिली आहे.
एटीएममधून पैसे काढून शेतक-याची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2016 3:24 AM