पातूरच्या अभ्युदय फाउंडेशन या सेवाभावी संस्थेने कोरोना काळात अनेक सेवाभावी उपक्रम राबविले आहेत. दिवसेंदिवस कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता अभ्युदय फाउंडेशन या सेवाभावी संस्थेने आयुर्वेदिक स्टीम सेंटर पातूर येथे उभारले आहे. या सेंटरचा लोकार्पण सोहळा २६ एप्रिल रोजी पार पडला. पातूरचे तहसीलदार दीपक बाजड यांच्या हस्ते या अभिनव उपक्रमाचे उदघाट्न पार पडले. यावेळी पातूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी सोनाली यादव, नायब तहसीलदार ए. एफ. सैय्यद, वैद्यकीय अधिकारी डॉ. रेवाळे, ग्रामविस्तार अधिकारी राहुल उंद्रे, अभ्युदय फाउंडेशनचे अध्यक्ष गोपाल गाडगे, सचिव बंटी गहिलोत उपस्थित होते. पहिल्याच दिवशी नागरिकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
पातूर येथील तहसील कार्यालय येथे या सेंटरचे उद्घाट्न पार पडले. उद्यापासून हे आयुर्वेदिक स्टीम सेंटर नगर परिषद शाळा क्रमांक २ येथे नागरिकांसाठी नि:शुल्क सुरू राहणार आहे. या अभिनव सेंटरच्या उभारणीसाठी अभ्युदय फाउंडेशनचे डॉ. संजयसिंह परिहार, प्रवीण निलखन, शुभम पोहरे, प्रा. चंद्रमणी धाडसे, प्रा. नरेंद्र बोरकर, शुभम उगले, विलास देवकर, संतोष लसनकर, आदींनी अथक परिश्रम घेतले. या सेंटरसाठी शुभम उगले यांनी सहकार्य केले.