- प्रवीण खेते लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : थॅलेसिमिया, हिमोफेलिया तसेच सिकलसेल या सारख्या आजाराने ग्रस्त रुग्णांना नियमित रक्त संक्रमणाची गरज असते. या रुग्णांना नि:शुल्क रक्त व रक्त घटक मिळावे यासाठी राज्यातील सर्वच रक्तपेढ्यांनी दर्शनी भागात मोफत रक्त पुरवठ्याचे फलक लावावे, असे निर्देश राज्य रक्त संक्रमण परिषदेने एका परिपत्रकाद्वारे दिले आहेत. विशेष म्हणजे केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाने या संदर्भात २०१४ मध्ये सूचना केली होती.थॅलेसिमिया आसो वा सिकलसेल या सारख्या आजारांमध्ये रुग्णांना वारंवार रक्त संक्रमण करावे लागते. त्यासाठी रुग्णांना पैसेही मोजावे लागतात. ही बाब लक्षात घेता, केंत्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागातर्फे २०१४ एका सूचनेनुसार, प्रत्येक परवानाधारक रक्तपेढ्यांना थॅलेसिमिया, हिमोफिलिया, सिकलसेल व रक्ताशी निगडित इतर आजाराच्या रुग्णांना रक्त व रक्त घटकाचा नि:शुल्क पुरवठा करण्याचे निर्देशित करण्यात आले होते. राज्यात त्याची अंमलबजावणी १८ जून २०१४ पासून बंधनकारक करण्यात आली होती; परंतु त्यानंतरही याची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे अनेक रुग्णांन पैशांअभावी रक्त मिळाले नाहीत. ही बाब लक्षात घेता राष्ट्रीय राज्य रक्त संक्रमण आणि राज्य रक्त संक्रमण परिषदेने आदेश जारी करत १६ डिसेंबर रोजी परिपत्रक काढले आहे. या परिपत्रकानुसार राज्यातील सर्वच परवानाधारक रक्तपेढ्यांना मोफत रक्तपुरवठा होत असल्याचे फलक दर्शनी भागात लावणे बंधनकारक करण्यात आले.तर रक्तपेढीचा परवाना रद्द!जर अशा रुग्णांना मोफत रक्तपुरवठा न झाल्यास, त्यासाठी शुल्क आकारल्यास, बदली रक्तदात्याची मागणी केल्यास किंवा रक्तघटक देण्यास टाळाटाळ केल्यास त्या रक्तपेढीचे नाहरकत प्रमाणपत्र आणि परवाना रद्द करण्यात येईल.डॉ. हेडगेवार रक्तपेढीने स्वीकारले रक्तपालकत्वडॉ. हेडगेवार रक्तपेढीने २००३ म्हणजेच स्थापनेपासून थॅलेसिमिया रुग्णांचे रक्तपालकत्व स्वीकारले. त्या अंतर्गत ५५ रुग्णांची नोंद करण्यात आली असून, गत वर्षभरात ८४१ रक्तपिशवीचा नि:शुल्क पुरवठा करण्यात आला आहे.
राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या परिपत्रकानुसार, सिकलसेल, थॅलेसिमियासारख्या आजाराच्या रुग्णांना मोफत रक्त पुरवठा करणे गरजेचे आहे. शिवाय, रक्तपेढ्यांनी या संदर्भात फलक लावण्याचेही बंधनकारक करण्यात आले आहे.- डॉ. श्रीराम चोपडे, विभाग प्रमुख, शासकीय रक्तपेढी, अकोला