येथील मारोती महाराज संस्थांमध्ये शेती मशागतीच्या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, तर प्रमुख उपस्थिती रा. यु. काँ. जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड, तालुका कृषी अधिकारी सुशांत शिंदे, विधानसभा अध्यक्ष नानासाहेब हिंगणकर, जि. प. माजी सभापती राजीव बोचे, तालुका अध्यक्ष रा. काँ. कैलास गोंडचवर, महासचिव रा. काँ. देवानंद मर्दाने, आदी होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी जि. प. सदस्य रमेश खलोकार होते. त्यानंतर अन्नपूर्णा रामकृष्ण दहीभात या विधवा महिला शेतकऱ्याच्या शेतात जाऊन ट्रॅक्टरच्या साह्याने पेरणीपूर्व मशागत करण्यात आली. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांनी यावेळी अन्नपूर्णा दहिभात यांच्या शेतात मशागतीच्या पट्टापाससाठी चक्क ट्रॅक्टर चालविला. त्यांच्या सोबतीला जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड आणि रा. यु. काँ. तालुका अध्यक्ष रा. म्हैसने यांनीसुद्धा श्रमदान केले. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे दत्ताभाऊ वाघ, गोपाल खलोकार, श्रीकांत साबळे, हरिदास दहिभात, वैभव पोटे, जयदीप चऱ्हाटे, गौरव डोंबाळे, प्रफुल म्हैसने, निलय मालधुरे, सागर म्हैसने, वैभव डिक्कर, ऋषिकेश म्हैसने, सौरभ म्हैसने, शेखर म्हैसने, सागर लातूरकर, रवी म्हैसने, संजय म्हैसने, बापूराव वानखडे, गोल्या वानखडे, मयूर बरबरे, सुमित ठाकूर, मोहित अहिर, अजय पिंपळे, सूरज राजूरकर, जनार्दन गवई, विशाल भुजबळ, अरविंद फुसे, गजानन देशमुख, गोठवाल, अमोल शेरकर, प्रभाकर गवळी, गौरव आखरे, गजानन रेवस्कार, गौरव पुसे, गजानन डांगे, अमोल डाबेराव, गजानन वाहिले, विजय ठोकळ उपस्थित होते.
फोटो:
मशागतीसाठी यांनी दिला मोफत ट्रॅक्टर!
गोरगरीब शेतकऱ्यांच्या शेती मशागतीसाठी दत्ता वाघ, विपुल ठाकरे, वैभव पोटे, राजेंद्र म्हैसने, आदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांना मोफत ट्रॅक्टर उपलब्ध करून दिला आहे.