मूर्तिजापूर : ग्रामपंचायत पोही येथे जागतिक अमली पदार्थविरोधी दिनानिमित्त चंद्राई व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्राच्या वतीने २४ जून रोजी आरोग्य तपासणी शिबिर कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष विनोद बावणेर, तसेच संस्था सचिव छाया बावणेर, प्रमुख पाहुणे ग्रामपंचायत पोहीचे सरपंच किशोर नाईक, उपसरपंच गोपाल आंबिलकर, संस्थेच्या प्रकल्प संचालक अपर्णा बोधलकर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. संस्थेचे वैद्यकीय अधिकारी डॉ.मोरे यांनी पोही येथील ग्रामस्थांची वैद्यकीय तपासणी केली. ग्रामपंचायत पोही येथील सर्व लाभार्थ्यांनी या शिबिरामध्ये उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. शिबिरात आलेल्या सर्व लाभार्थ्यांना औषध वाटप करण्यात आले. व्यसनमुक्तीबद्दल समुपदेशन करण्यात आले.
शिबिराला संस्थेतील कर्मचारी समुपदेशक विजय प्रभे, आशिष मोहोड, वृषा भटकर, प्रशांत सोळंके, विजय गायकवाड, तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अपर्णा बोधलकर आणि सूत्रसंचालन विजय प्रभे यांनी केले, तर आभार सरपंच किशोर नाईक यांनी मानले.