हा कार्यक्रम आ.गोवर्धन शर्मा, धर्माचार्य व समन्वयक शिवदत्तजी महाराज, अकोला शाखेचे प्रधान पुरुषोत्तम वानखड़े, महामत्री विश्वजीत सिसोदिया आदींच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला. यावेळी टीकाराम येसनसुरे, दिगंबर सपकाळ, मनोहरराव खरपकर, रामदास गावत्रे,शाम ठाकुर,मकरंद राजुरकर आदी उपस्थित होते.
.........
गौरक्षण रोडवरील पथदिवे बंद
अकोला : शहरातील गौरक्षण रोडवर सहकारनगर ते तुकाराम चौकदरम्यान पथदिवे बंद असल्याचे दिसून येत आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी परिसरात अंधार पसरलेला असतो. हीच गत शहरातील विविध भागांतही दिसून येत आहे.
......................
गायगाव मार्गाची दुरवस्था
अकोला : गायगाव जाणाऱ्या मार्गाची दुरवस्था झाली असून, अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले आहेत. हा रस्ता पूर्णपणे उखडून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत.
...................
रस्त्याचे अर्थवट बांधकाम
अकोला : शहरातील टिळक रोड ते अकोट स्टॅन्ट या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले. मात्र, हा रस्ता काही ठिकाणी अर्धवट सोडण्यात आला आहे. त्याचा परिणाम रस्त्यावरील वाहतुकीवरही होताना दिसताे. अर्धवट सोडलेल्या रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
.......................
बदलत्या वातावरणाचा आरोग्याला फटका
अकोला: जिल्ह्यातील दिवसा गर्मी, तर दुपारी मान्सूनपूर्व पावसामुळे तयार झालेले थंड वातावरण त्याचा फटका आरोग्याला बसत असून, दवाखाने हाऊसफुल्ल होत आहेत. मोठ्यांसह चिमुकल्यांमध्येही सर्दी, खोकला आणि तापाची लक्षणे दिसून येत आहेत.
................
एटीएममध्ये ठणठणाट
अकोला: शनिवार, रविवार सुट्टीचा दिवस असल्याने, अनेक जण बाजारहाट करतात. मात्र, याच दिवशी शहरातील काही एटीएममध्ये ठणठणाट असल्याचे दिसून आले. कौलखेड, तुकाराम चौक परिसरातील काही एटीएममध्ये पैसेच उपलब्ध नसल्याने अनेकांची पंचाईत झाल्याचे दिसून आले.