पातूर : तालुक्यातील खामखेड येथील २३ पॉझिटिव्ह रुग्णांना होम क्वाॅरण्टिन राहण्यास सांगितल्यावरही गावात मुक्त संचार करीत असल्याने गावकरी भयभयीत झाले आहेत. ९०० लोकसंख्येच्या खामखेड्यात दोन महिन्यांत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. ग्राम समित्या कागदावरच असल्याने, कोणाचेही या रुग्णांवर नियंत्रण नाही.
२० मे २०२१ रोजी आरोग्य विभागाने ७५ जणांची आरटीपीसीआर आणि रॅपिड चाचणी केली. यात २३ नागरिक पॉझिटिव्ह आले. या सर्वांना आरोग्य यंत्रणेने गृहविलगीकरणात राहण्यास सांगितले. असे असले तरी पॉझिटिव्ह रुग्ण गावात मुक्त संचार करत असल्याची माहिती आहे. खामखेड ग्रामपंचायत यंत्रणा तथा ग्रामपातळीवरील समिती यासंदर्भात कुठलेही पावले उचलत नसल्याची गावकऱ्यांची तक्रार आहे.
पातूर तालुक्यात ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असून, कोरोना संसर्ग नियंत्रित करण्यासाठी जिल्ह्यात कडक निर्बंध लागू असताना, ग्रामीण भागात रुग्णांच्या संख्येत दररोज वाढ होत आहे. तालुक्यात २२३५ रुग्ण पॉझिटिव्ह निघाले होते. त्यापैकी ३८५ सध्या सक्रिय आहेत. पैकी ३५८ पॉझिटिव्ह रुग्णांना होम क्वाॅरण्टिन राहण्यास आरोग्य विभागाने बजावले आहे.
फोटो :
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली
तालुक्यातील ८६ गावांपैकी सर्वच गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण कमी-अधिक प्रमाणात आहेत. शासनाने जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने गतवर्षी ग्रामपातळीवर समित्यांचे गठन केले होते. मात्र सध्या स्थिती कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मुक्त संचार वाढला. त्यामुळे कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत गाव पातळीवर समित्या केवळ कागदावरच कार्यरत असल्याचे चित्र गावागावात दिसत आहे.
खामखेड्यात तीन जणांचा मृत्यू
खामखेडमध्ये २३ पॉझिटिव्ह रुग्ण असून, तीन जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. मात्र यंत्रणा बेफिकीर असल्याचे दिसून येत आहे. गावागावांतील कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी गावातील समिती सक्रिय करण्याची गरज आहे.
===Photopath===
230521\screenshot_20210523_150002.jpg
===Caption===
खामखेड