शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
2
IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?
3
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
4
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
5
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
6
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
7
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
8
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
9
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
10
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
11
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
12
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
13
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
14
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
15
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
16
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
17
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
18
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
19
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
20
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...

अंबाबरवा अभयारण्यातील गावांच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा

By admin | Published: April 30, 2016 1:45 AM

अंबाबरवा अभयारण्यातील तीन गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागला.

राजेश शेगोकार/ बुलडाणा मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा कॉरिडॉर म्हणून पाहिले जाणार्‍या अंबाबरवा अभयारण्यातील तीन गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागला असून अंबाबरवा गाव येत्या पंधरवड्यात पूर्णपणे उठविले जाणार आहे. अभयारण्यातील सर्व सहा गावे उठल्यानंतर वाघांना मध्यप्रदेशातील सिपना ते अंबाबरवा असा मोठा जंगलपट्टा मुक्त संचार करण्यासाठी मिळणार आहे. अंबाबरवा परिसर २00३ पासून व्याघ्र प्रकल्प घोषित करण्यात आला आहे; मात्र तरीही अभयारण्यातील गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित होता. येथील एकूण सहा गावांचे पुनर्वसन अभिप्रेत आहे. त्यापैकी खिडकी, चुनखडी आणि अंबाबरवा या तीन गावांसंदर्भात प्राधान्याने निर्णय घेण्यात आला आहे. अंबाबरवा अभयारण्यातील या तीन गावांच्या ७४0 कुटुंबांचे प्रारंभी पुनर्वसन करावयाचे होते. त्यांच्या याद्यांची फेरतपासणी करण्यात आल्यानंतर प्रत्यक्षात ५१७ कुटुंबे पुनर्वसन आणि मदतीसाठी पात्र ठरली होती. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी यांनी १0 मे २0१५ रोजी अंबाबरवा अभयारण्याला अनपेक्षितपणे भेट देऊन ग्रामस्थांनी शासकीय नियमानुसार रोख रक्कम घेऊन पुनर्वसीत व्हावे, अशी भूमिका मांडली होती. यावेळी तीनही गावांमध्ये ग्रामस्थांची सभा त्यांनी घेतली होती. १४ वर्षांपासून रखडलेला पुनर्वसनाचा प्रश्न निकाली काढण्यात ही बैठक मोलाची ठरली होती. गुरुवार, २८ एप्रिल रोजी अंबाबरवा गावात आकोट वन्यजीव विभागाचे उप वनसंरक्षक उमेश वर्मा यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांसोबत बैठक झाली. त्यानुसार १५ मेपर्यंत अंबाबरवा गावातील ग्रामस्थांनी ऐच्छिक पुनर्वसन अंतर्गत गाव सोडण्याची तयारी दर्शविल्याची माहिती वन विभागाच्या सूत्रांनी दिली.