अकोला : सर्वात मोठा राष्ट्रध्वज तयार करून दोन वर्षांपूर्वी ह्यलिमका बुकह्णमध्ये स्थान मिळविणार्या अकोल्यातील 'नॅशनल इंटिग्रिटी मिशन' या सेवाभावी संस्थेने भारताच्या सुवर्णमहोत्सवी स्वातंत्र्यदिनापासून अकोला शहरात अभिनव उपक्रम राबविण्यास प्रारंभ केला. मनामनांत राष्ट्रभक्तीची मशाल जागृत ठेवण्याच्या दृष्टिकोनातून स्थापित केलेल्या या संस्थेच्यावतीने यावेळी दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे १0१ फूट उंचीचे तैलचित्र उभारण्यात येणार आहे. 'नॅशनल इंटिग्रिटी मिशन' संस्थेने १९९९ साली रॅलीच्या माध्यमातून एक कि.मी. पेक्षाही लांब कापडी राष्ट्रध्वजाची तिरंगी पट्टी शहरातील प्रमुख मार्गांंवरून फिरविली. ती पकडण्यासाठी हजारो अकोलेकर सरसावले होते. २00६ मध्ये चिकनगुनीया या आजाराचा उद्रेक वाढल्याने संस्थेच्यावतीने तब्बल ३.५ लाख रुपये किमतीची औषधे शहरातील गरजू रुग्णांना वितरित करण्यात आली होती. २0१३ मध्ये संस्थेने वाराणसी येथील भव्य राष्ट्रध्वज निर्मितीचा विक्रम मोडला. मेहेरबानू महाविद्यालयात हजारो मीटर कापडाचा (२१६.५४ बाय १४४.३६ फूट आकाराचा) तिरंगा राष्ट्रध्वजाच तयार करण्यात आला. स्वातंत्र्यदिनी तो राष्ट्रध्वज मेहेरबानू महाविद्यालयातून क्रिकेट क्लब मैदानावर नेत असताना देशाभिमान जागृत झालेले हजारो अकोलेकर त्यास उचलून धरण्यासाठी सरसावले होते. 'लिमका बुक' मध्ये या उपक्रमाची नोंद झाली होती. ही संस्था यंदाच्या स्वातंत्र्य दिनी डॉ. कलाम यांचे १0१ फूट उंच तैलचित्र उभारणार आहे.*अभिनव उपक्रमांची धुरा यांच्या खांद्यावर.नॅशनल इंटिग्रिटी मिशन संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेश जाधव यांच्यासह बी.एस. देशमुख, प्रा. डॉ. संतोष हुशे, गणेश कटारे, राजू बगथरिया, जयशन गुडधे, अभिषेक कोकाटे, राजेश भंसाली, जमीलभाई, सादीकभाई, इलियास गौरवे, अँड. रविंद्र पोटे, अँड. समीर पाटील, अँड. राजनारायण मिश्रा, सै. नबील, पराग कांबळे, पंकज कांबळे, अभय दांडगे, संदेश इंगळे, शेखर सायरे, संजय गावंडे, सचिन गिरी, मनोज शहा, गुड्ड राठोड, मयूर बोंडे, सदाशिवखान पठाण, प्रकाश तायडे आदींसह संस्थेचे इतर कार्यकर्ते दरवर्षी स्वातंत्र्य दिनी आयोजित केल्या जाणार्या अभिनव उपक्रमाची धुरा सांभाळतात.
स्वातंत्र्यदिनी अब्दूल कलाम यांचे १0१ फूट तैलचित्र उभारणार
By admin | Published: August 14, 2015 11:11 PM