दिग्रस बु: सस्ती येथील महावितरणच्या वीज उपकेंद्रांतर्गत येत असलेल्या अनेक गावातील विद्युत रोहित्रांमध्ये बिघाड होत असल्याने वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. त्यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले असून, महावितरणचे दुर्लक्ष होत आहे.
गत पंधरा दिवसांपासून सस्ती वीज उपकेंद्र अंतर्गत येत असलेल्या १० ते १५ गावांतील वीजपुरवठा खंडित होत आहे. यामुळे सस्ती, दिग्रस बु, दिग्रस खुर्द,तुलन्गा,लावखेड, निमखेड आदी परिसरातील पूर्ण गावातील ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. पाऊस सुरू होताच गावातील वीजपुरवठा खंडित होत आहे. याबाबत वारंवार तक्रार देऊनही वरिष्ठांचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सुर उमटत आहे. वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी जीवन उपर्वट, विशाल इंगळे, प्रतीक गवई, प्रसेनजीत रोकडे, धीरज गवई, अंकेश गवई आदींनी केली आहे.
----------
सस्ती येथील वीज केंद्रांतर्गत गावातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिक वैतागले आहेत. वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास वीज उपकेंद्रात तीव्र आंदोलन करण्यात येईल.
-जीवन उपर्वट, प्रहारसेवक, हिंगणा, ता. पातूर.
-----------------------------
गावात दिवसभर वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक वैतागले आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन वीजपुरवठा सुरळीत करावा.
-विशाल इंगळे, ग्रामस्थ, दिग्रस खुर्द.