३० वर्षांपासून सर्व वर्गमित्र वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी, व्यवसायात, संसारात मग्न झाले होते; परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांनी एकत्र येऊन आगळावेगळा कार्यक्रम आयोजित केला. फोन कॉल्स, व्हॉट्सॲप,
फेसबुकच्या माध्यमाने दूर गेलेले मित्र जवळ झाले. सर्व माजी विद्यार्थ्यांनी जागेश्वर विद्यालय येथे शिक्षण घेऊन प्रगती केली. १९९० मध्ये असलेले सर्वच शिक्षक, कर्मचारी ३० वर्षांनंतर एकत्र आले.
फक्त शिक्षकच नव्हे, तर शिपाई, कारकून, प्रयोगशाळा कर्मचारी यांचाही सत्कार करण्यात आला, तसेच सर्व मित्रांनी संस्थेला छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती भेट देऊन संचालक मंडळाचा आदरपूर्वक सन्मान केला. या कार्यक्रमात प्रत्येक विद्यार्थ्याने आपला स्वतःचा आजच्या स्थितीचा कुटुंबासह परिचय दिला. अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. संक्रांतीपर्व सुरू असल्याने कमल वाडकर, संगीता मसने, वनिता मानकर यांनी हळदी-कुंकू कार्यक्रम घेतला. कार्यक्रमासाठी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, रायपूर, औरंगाबाद, विदेशात असणारे सुभाष वाडकर यांनी विशेष हजेरी लावली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी वसंत वक्टे, शिवचरण नावकार, राजेश चिंचोळकर, गणेश मानकर, दीपक नकासकर, मंगेश धनोकार, विजय सरप, रंजित अहिर, शेषराव सरप, प्रकाश ह. मसने, बंडू हुसे, गणेश बडे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन वसंत वक्टे, अनंत देशमुख, शिवचरण नावकार यांनी केले. आभार डॉ. अविनाश इंगळे यांनी मानले.
फोटो: