लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पातूर-बाळापूर तालुक्यातील १०० टक्के नुकसान झालेल्या फळबागांचे तत्काळ पंचनामे, सर्वेक्षण करून नुकसान भरपाईसाठी फळ बागायतदार शेतकऱ्यांनी जिल्हा कृषी अधीक्षक मोहन वाघ यांना गुरुवारी घेराव घातला.सततच्या पावसामुळे खरीप पिकांसोबत लिंबू, संत्रा, मोसंबी फळबागांच्या फळबहाराचे अतोनात नुकसान झाले. लांबलेल्या पावसामुळे वातावरण बदल झाला. त्यामुळे आॅक्टोबर महिन्यात येणारा हस्तबहार आला नाही. त्यामुळे यंदाच्या हंगामात फळबागांना फळधारणा होणार नाही. परिणामी, शेतकरी हवालदिल झाला आहे. जिल्हा ग्राहक मंचाच्या कार्यालयात कामानिमित्त आलेल्या जिल्हा कृषी अधीक्षक मोहन वाघ यांना आवारात गाठून फळ बागायतदार शेतकºयांनी घेराव घातला आणि फळबागांची नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. जिल्हा कृषी अधीक्षक मोहन वाघ यांनी फळ बागायातदार शेतकºयांना तत्काळ सर्वेक्षण करण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांना सोबत घेऊन पोहोचणार असल्याचे शेतकºयांना सांगितले. घेराव घालणाºयांमध्ये संजय उजाडे, सुनील गाडगे, गजानन बोचरे, संजय ढाळे, संतोष लोखंडे, संजय लोथे, दीपक मसने, डिगांबर मानकर, स्वप्निल कोकाटे, गोपाल वाढोकार, गणेश वसतकार, राजेंद्र देशमुख व पुरुषोत्तम देशमुख हे शेतकरी होते. (वार्ताहर)
फळ बागायतदार शेतकऱ्यांचा जिल्हा कृषी अधीक्षकांना घेराव!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 12:24 PM