व्याळा: भूमी अभिलेख जिल्हा अधीक्षक पदाचा कारभार प्रभारींच्या खांद्यावर असल्याने शेतकऱ्यांची कामे खोळंबली आहेत. त्यामुळे या पदावर पूर्णवेळ अधिकारी नेमण्यात यावा, अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर फोरमतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमने दिलेल्या निवेदनानुसार, गेल्या नऊ ते दहा महिन्यांपासून विभागीय उपसंचालक भूमी अभिलेख, अमरावती हे पद रिक्त आहेच. या पदाचा प्रभारी कारभार जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख, अकोला शिरोडकर यांच्याकडे आहे. या पदाचा कारभार देत असताना जमाव बंदी आयुक्त, पुणे यांनी त्यांना अधिकार दिले नाहीत. त्यामुळे अमरावती विभागातील शेतकऱ्यांची कामे थांबली आहेत. विभागातील भूमी अभिलेख, नझुल विभागातील सर्वसामान्यांची कामे प्रलंबित राहात आहेत. त्यामुळे या पदावर पूर्णवेळ अधिकारी नेमावा किंवा प्रभारी असलेले जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांना सर्वसामान्यांचे कामे मार्गी लावण्याचे अधिकार द्यावेत, अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमतर्फे महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवांकडे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत दिलेल्या निवेदनातून केली आहे. निवेदन देताना जिल्हा अध्यक्ष उज्ज्वल अंभोरे, रंजीत सरदार, दिनेश खोब्रागडे, संघपाल वानखडे, रमेश काळबागे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.