अकोला : जिल्ह्यातील महिला शेतकºयांना बियाणे वाटप करण्याच्या योजनेचा ३२ लाख रुपयांचा निधी महिलांना शिलाई मशीन व सायकल वाटप योजनेवर खर्च करण्यास जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समितीच्या सभेत शुक्रवारी मंजुरी देण्यात आली.जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागामार्फत जिल्ह्यातील महिला शेतकºयांना बियाणे वाटप करण्यासाठी ३५ लाख रुपयांची योजना राबविण्याचा निर्णय यापूर्वी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला होता. मात्र, महिलांना बियाणे वाटपाचा हा निधी शिलाई मशीन वाटप, सायकल वाटप आणि अंगणवाडीतील मुलांसाठी बक्सर पट्टीकरिता खर्च करण्यास महिला व बालकल्याण समितीच्या सभेत मंजुरी देण्यात आली. त्यामध्ये महिलांना शिलाई मशीन वाटप योजनेसाठी १६ लाख रुपये, सायकल वाटप योजनेसाठी १६ लाख रुपये आणि अंगणवाडीतील मुलांना बसण्यासाठी बक्सपट्टी खरेदीकरिता दोन लाख रुपयांचा निधी खर्च करण्यास मंजुरी देण्यात आली. महिला व बालकल्याण सभापती देवका पातोंड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेला समिती सदस्य ज्योत्स्ना बहाळे, मंजूषा वडतकार, माया कावरे, आशा येखे, मंगला तितूर यांच्यासह महिला व बालकल्याण विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश जवादे आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.२५ आॅगस्टपर्यंत पं.स. स्तरावर लाभार्थींचे अर्ज घेणार!जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाºया शिलाई मशीन आणि सायकल वाटप योजनेंतर्गत जिल्ह्यातील लाभार्थींचे अर्ज २५ आॅगस्टपर्यंत संबंधित पंचायत समिती स्तरावर घेण्याचे या सभेत ठरविण्यात आले.‘त्या’ वंचित लाभार्थींना प्राधान्याने देणार योजनेचा लाभ!जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागामार्फत महिलांना शिलाई मशीन व सायकल वाटप योजनेंतर्गत गतवर्षी निवड करण्यात आलेल्या; मात्र योजनेचा लाभ न दिलेल्या वंचित महिला लाभार्थींना यावर्षी प्राधान्याने योजनेचा लाभ देण्याचेही महिला व बालकल्याण समितीच्या सभेत ठरविण्यात आले.