अकाेला : केंद्रीय रस्ते विकास निधीअंतर्गत सात रस्त्यांच्या कामांसाठी ४६ कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला असून पूर्णा नदीवर दोनवाडा ते काटीपाटी दरम्यान नवीन पुलाचे बांधकाम करण्यात येणार आहे.
केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या पाठपुराव्याने जिल्ह्यातील जिल्ह्यातील रस्त्यांचे जाळे अधिक विस्तारित व अद्ययावत करण्यासाठी या निधीचा माेठा दिलासा मिळणार आहे. मंजूर रस्ताकामांमध्ये पूर्णा नदीवर दोनवाडा ते काटीपाटी दरम्यान नवीन पुलाचे बांधकाम करण्यासाठी सुमारे ११.७ कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. अकोला जिल्ह्यात भांबेरी, पारळा, देवर्डा, मनब्दा, दापुरा, पारळा, निजामपूरवरील कि.मी. १४ ते कि.मी. १९पर्यंत रस्त्याचे रुंदीकरण व मजबुतीकरणासाठी ५.८६ कोटी रुपये, नागद-सागद, कारंजा रमजानपूर, हातरून रस्त्याच्या कि.मी. ५ ते कि.मी. १२ रस्त्याच्या बांधकामासाठी ५.९३ लाख रुपये, उकळी बाजार, नेर, नांदखेड, किनखेड रस्त्याच्या कि.मी. ५० ते कि.मी. ५६ रस्त्याचे रुंदीकरण व सुधारणा कामासाठी ६.३२ कोटी रुपये आणि गोरेगाव, माझोड, आलेगाव, कि.मी. ५२ ते कि.मी. ९० मधील रस्त्याचे बांधकाम व सीडी वर्क कामासाठी ४.९४ कोटी रुपये, शिरपूर, कारंजी, वाशीम रस्त्याच्या कि.मी. ० ते ६ मध्ये रस्त्याची सुधारणा करण्यासाठी ५.८६ कोटी रुपये इतका भरघोस निधी मंजूर करण्यात आलेला आहे.