शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये आज नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार; सभेसाठी १ लाख लोक जमवण्याचे महायुतीचे नियोजन
2
Susie Wiles : कोण आहेत सूझी विल्स? ज्यांना डोनाल्ड ट्रम्प यांनी बनवलं व्हाईट हाऊसच्या चीफ ऑफ स्टाफ
3
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका; पुन्हा MCLR मध्ये वाढ, होमलोनचा EMI वाढणार
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: यंदाच्या निवडणुकीत राज्यातील ३५ मतदारसंघात अल्पसंख्याक मतदार ठरणार निर्णायक
5
राजकीय वादांचे बॉम्ब, निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोपांचे फटाके, नवनवीन मुद्दे आणि वादग्रस्त वक्तव्यांची मालिका
6
आजचे राशीभविष्य, ८ नोव्हेंबर २०२४ : प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल, खर्चाचे प्रमाण वाढेल
7
US Fed Rate Cut : अमेरिकेत पुन्हा व्याजदरात कपात; फेडनं ०.२५ टक्के कमी केला रेट, शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
8
कांदा ८०, लसूण ५०० रुपये किलो! निवडणुकीच्या तोंडावर दरवाढ, सर्वपक्षीय उमेदवारांना टेन्शन
9
निवडणुकीत अल्पसंख्याक मतदारांची भूमिका महत्त्वाची, राज्यातील ३५ जागांवर ठरणार निर्णायक
10
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
11
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
12
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
13
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
14
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
15
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
16
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
17
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
18
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
20
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात

अकोला जिल्ह्यातील १८८५ पैकी ११८ किमीच्या रस्त्यांसाठीच निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2018 4:08 PM

अकोला: अकोला जिल्ह्यासाठी २००१ ते २०२१ या काळातील रस्ते विकास आराखड्यातील १८८५ कि.मी.चे रस्ते नव्याने तयार करावे लागणार आहेत. त्यापैकी चालू वर्षात जिल्ह्यातील २८ रस्त्यांच्या ११८ किमी बांधकामासाठी शासनाने ८३ कोटी रुपये निधी देत शासनाने जिल्ह्याची बोळवण केली आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेकडे असलेल्या ग्रामीण मार्गांची एकू ण लांबी २,१५३ कि.मी. आहे. ग्रामीण मार्गांची एकू ण लांबी २,१५३ कि.मी. आहे. गेल्या काही वर्षात जिल्हा परिषदेने ६५७ कि.मी. रस्त्यांची निर्मिती केली.

- सदानंद सिरसाटअकोला: अकोला जिल्ह्यासाठी २००१ ते २०२१ या काळातील रस्ते विकास आराखड्यातील १८८५ कि.मी.चे रस्ते नव्याने तयार करावे लागणार आहेत. त्यापैकी चालू वर्षात जिल्ह्यातील २८ रस्त्यांच्या ११८ किमी बांधकामासाठी शासनाने ८३ कोटी रुपये निधी देत शासनाने जिल्ह्याची बोळवण केली आहे. या प्रमाणात रस्त्यांसाठी निधी मिळाल्यास आणखी दहा ते बारा वर्षे जिल्ह्याच्या रस्ते विकासाला लागण्याची शक्यता आहे.आराखड्यात जिल्हा परिषदेकडे असलेल्या ग्रामीण मार्गांची एकू ण लांबी २,१५३ कि.मी. आहे. गेल्या काही वर्षात जिल्हा परिषदेने ६५७ कि.मी. रस्त्यांची निर्मिती केली. १,४९५ कि.मी.चे रस्ते निर्मिती करण्यासाठी निधीची गरज आहे. त्याचवेळी प्रमुख जिल्हा मार्ग, इतर जिल्हा मार्ग, ग्रामीण रस्त्यांची कामे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून करण्याचा सपाटा शासनाने लावला आहे.आधी जिल्हा परिषदेकडे असलेल्या ग्रामीण रस्त्यांपैकी कामे न झालेल्या रस्त्यांची लांबी १,४९५ कि.मी. आहे. या रस्त्यांना प्रारूप आराखड्यात क्रमांक देण्यात आले आहेत. त्या रस्त्यांवर केवळ बैलगाड्या चालू शकतात. आराखड्यात आहेत; पण त्या रस्त्यांवर मुरूम टाकला नाही, खडीकरण झाले नाही, कोणत्याही तुकड्याचे डांबरीकरण किंवा काँक्रिटीकरण झाले नाही, तसे काम झाल्याची त्या रस्ता क्रमांकावर नोंद नाही, ते रस्ते आराखड्यानुसार मिसिंगमध्ये गणले जातात. त्या कामांसह काही इतर जिल्हा मार्ग, प्रमुख जिल्हा मार्गाच्या काही किमीच्या कामांसाठी शासनाकडून निधी दिला जात आहे. ते प्रमाण तुटपुंजे असल्याने जिल्ह्यातील रस्त्यांचे रूप बदलण्यास आणखी बरीच वर्ष लागण्याची शक्यता आहे.

 कामासाठी निधी मिळालेले रस्तेअकोला तालुक्यातील अनकवाडी-आपातापा, कोठारी-तामशी, रामगाव-दापुरा, रामगाव-मुजरे मोहम्मदपूर, काटी, पाटी जोडरस्ता, रोहणा-ब्रह्मपुरी, वडद जोड रस्ता, अकोट तालुक्यातील केळीवेळी-गिरजापूर, दिवठाणा जोड रस्ता, मंचनपूर रस्ता, ढगा फाटा-करतवाडी, रंभापूर जोड रस्ता, बार्शीटाकळी तालुका वरखेड-अंजनी खु., खोपडी-माळशेलू, बाळापूर तालुक्यातील डोंगरगाव-लोहारा, भिकुंडखेड रस्ता, मूर्तिजापूर तालुक्यातील हेंडज-उनखेड, सांगवा मेळ-कौलखेड, साखरी-सिरसो, पातूर तालुक्यातील चौफुली ते वसाली, दिग्रस फाटा ते तांदळी बु., गोंधळवाडी-दुधाणी, बाभूळगाव-सस्ती, तेल्हारा तालुक्यातील वडगाव रोठे-निंभोरा-पातुर्डा, रायखेड-चांगलवाडी, वाडी-अवार अशा एकूण २८ रस्त्यांच्या ११८ किमीच्या कामांसाठी ८३ कोटी ५१ लाख रुपये निधी शासनाने दिला आहे. 

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद