अकोला : खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कौलखेड परिसरात देशी व विदेशी दारूची मैदानातून खुलेआम विक्री करणाऱ्या इसमास शहर पोलीस उपअधीक्षक सचिन कदम यांच्या विशेष पथकाने रविवारी रात्री ताब्यात घेतले. त्याच्याकडून दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे.
खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हॉटेल लोट्सच्या बाजूला असलेल्या एका मोकळ्या मैदानात आरोपी धनंजय रामचंद्र वानखडे वय ३५ वर्षे हा देशी व विदेशी दारूची अवैधरीत्या विक्री करीत असल्याची माहिती शहर पोलीस उपअधीक्षकायांच्या विशेष पथकाला मिळाली. या माहितीवरून त्यांच्या पथकाने सापळा रचून दारू विक्रेता धनंजय वानखडे यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून देशी व विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी दारूविक्रेत्याविरुद्ध खदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, शहर पोलीस उपअधीक्षक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या विशेष पथकाचे जितेंद्र हरणे, महेंद्र बहादूरकर, विनय जाधव, रवी घिवे, राज ठाकूर, शेख नदीम यांनी केली.