शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! IPS रश्मी शुक्ला पुन्हा महाराष्ट्राच्या DGP बनल्या, निवडणूक काळात काँग्रेसच्या तक्रारीवरून पदावरून हटवले होते
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्री निवासस्थावरील एकनाथ शिंदेंच्या नावाची पाटी आधी काढली, पुन्हा लावली; चर्चांना उधाण
3
Maharashtra Assembly Election Result 2024: मुख्यमंत्रिपद टिकवण्यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्नशील; भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांसाठी आग्रही
4
तुमचं Pan Card निरुपयोगी होणार का? QR कोडसह नवीन कार्ड कसे मिळवायचं
5
IPL 2025 : कोणत्या खेळाडूला किती भाव मिळाला? सर्व १० संघांची संपूर्ण यादी एका क्लिकवर
6
नागा चैतन्यशी घटस्फोटावर समांथाने ३ वर्षांनी सोडलं मौन, म्हणाली- "माझ्याबद्दल खोट्या गोष्टी सांगितल्या गेल्या..."
7
Essar समूहाचे सह-संस्थापक शशी रुईया यांचं निधन; ८० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
चंदिगडमध्ये रॅपर बादशाहच्या नाईट क्लबमध्ये स्फोट; खंडणीच्या उद्देशाने स्फोट, पोलिसांचा दावा
9
नागपुरात कुणाच्या गळ्यात पडणार मंत्रिपदाची माळ, कोणती नावे शर्यतीत?
10
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
11
मुख्यमंत्रि‍पदावरून नाराज असल्याची चर्चा; आमदारांबाबत एकनाथ शिंदेंनी उचललं महत्त्वाचं पाऊल
12
RBI गव्हर्नर शक्तिकांता दास यांची प्रकृती अचानक बिघडली 
13
Maharashtra Election: 'या' १२ मतदारसंघात बसपा, वंचित व मनसेपेक्षा अपक्ष उमेदवार ठरले भारी!
14
चांगल्या कामासाठी मराठी माणसं एकत्र येणं चांगलेच; आमदार महेश सावंत यांचं विधान
15
मुख्यमंत्रि‍पदासाठी शिवसेना नेते आग्रही, पण शिंदेंचा कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज; म्हणाले...
16
LIC नं सप्टेंबर तिमाहित केली ३८००० कोटींच्या शेअर्सची विक्री, तुमच्याकडे आहेत का ‘हे’ स्टॉक्स?
17
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची पिछेहाट, राज्यातील या २३ जिल्ह्यांत फोडता आला नाही भोपळा
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिकदृष्टया फायदेशीर दिवस
19
PAN 2.0 प्रोजेक्ट काय आहे? खर्च होणार १४३५ कोटी रुपये; तुमच्या पॅन कार्डाचं काय होणार? जाणून घ्या
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: भाजप २६.७७% मतांसह राज्यात नंबर वन; मविआत मतांमध्ये कोणता पक्ष ठरला सरस?

पोलीस पोहोचण्यापूर्वीच जुगारी फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 9:40 AM

जुगार माफियांनी पूर्ण अड्डाच खाली करून घेतल्याने पोलिसांच्या हातात काहीही न लागल्याने पथक खाली हातच परतले.

अकोला : जुगार माफिया म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या अन्सार व लड्डा या दोघांचे जुगार अड्डे उद्ध्वस्त करण्यासाठी शहर पोलीस उपअधीक्षक व पोलिसांनी शनिवारी छापेमारी केली; मात्र पोलिसांच्या कारवाईची आधीच कुणकुण लागलेल्या जुगार माफियांनी पूर्ण अड्डाच खाली करून घेतल्याने पोलिसांच्या हातात काहीही न लागल्याने पथक खाली हातच परतले. वर्षानुवर्षांपासून खुलेआम तसेच शंभर ते दीडशे लोकांचा एकाच ठिकाणी जुगार अड्डा सुरू असतानाही पोलिसांना काहीही न मिळाल्याने पोलिसांचे खबरे तसेच त्यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.डाबकी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांच्याच आशीर्वादाने जुगार माफिया अन्सार व लड्डा या दोघांचे मोठे जुगारअड्डे खुलेआम सुरू असल्याची चर्चा पोलिसातच आहे; मात्र या गंभीर जुगार अड्ड्यांची माहिती व तक्रारी वरिष्ठ स्तरावर पोहोचल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी या ठिकाणी कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर शहर पोलीस उपअधीक्षक व पोलिसांनी शनिवारी जुगार माफिया अन्सार व लड्डा या दोघांच्या जुगार अड्ड्यांवर धाव घेतली; मात्र पोलीस येण्यापूर्वीच जुगार अड्ड्यामधील सर्व जण पसार झाल्याने जुगार अड्ड्यांवर पोलिसांच्या हातात काहीच लागले नाही. त्यामुळे पोलिसांनी या दोन्ही जुगार अड्ड्यांमधील साहित्य जमा करून तेथेच जाळले. खुलेआम सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर पोलिसांची रेड पडताच कुणीही न सापडल्याने ही रेड होण्यापूर्वीच जुगार माफियांना माहिती मिळाल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे. यावरून सदर जुगार अड्ड्यांवर कारवाई होण्यापूर्वी पोलिसांनीच माहिती लीक केल्याने त्यांचीच मिलीभगत असल्याचीही माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. त्यामुळेच पोलिसांना कारवाई न करताच खाली हात परतावे लागण्याचे वास्तव आहे. तत्कालीन पोलीस अधीक्षकांवर दगडफेकडाबकी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत या पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांच्या पाठबळाने जुगार माफिया अन्सार व लड्डा यांचा जुगार अड्डा खुलेआम सुरू असतो, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे दीड वर्षांपूर्वी तत्कालीन पोलीस अधीक्षक गौरख भामरे यांनी पथकासह या दोन्ही जुगार अड्ड्यांवर छापेमारी केली असता तेथील जुगाऱ्यांनी पोलीस अधीक्षक भामरे यांच्यासह त्यांच्या पथकावर दगडफेक करीत मारहाण केली होती. त्यानंतर हे जुगार अड्डे बंद करण्याचे प्रयत्न पोलिसांनी केले; मात्र त्यानंतरही हे दोन जुगार अड्डे सुरूच आहेत. यावरून पोलिसांवर जुगार माफिया भारी असल्याचे दिसून येत आहे. आता नवे पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या कार्यकाळात तरी हे जुगार अड्डे बंद होतील का, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी