अकोला: जुने शहरातील शिवसेना वसाहत परिसरात सुरू असलेल्या जुगारावर पोलिसांनी छापा घालून आठ आरोपींना अटक केली. शिवसेना वसाहतीमध्ये सुरू असलेल्या जुगारावर पोलिसांनी छापा घालून शिवसेना वसाहतीत राहणारा गजानन शंकर गव्हाळे (४५), गजानन नगरातील शुभम राजेश आमले, खैर मोहम्मद प्लॉटमधील शेख वसीम शेख कयुम, गाडगे नगरात राहणारे संतोष रामसिंग करंगे, सोनटक्के प्लॉटमधील फिरोज खान सलीम खान, अकील खान गुफरान खान, मलकापूर येथील अत्तरलाल संतलाल चव्हाण, गंगा नगरातील शेख करीम शेख रहीम अशा आठ आरोपींना अटक केली. या आठ जणांना अटक करून त्यांच्याजवळून पोलिसांनी जुगाराचे साहित्य आणि रोख १६५0 रुपये जप्त केले. ही कारवाई जुने शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक वाघू खिल्लारे यांच्या मार्गदर्शनात हेकाँ दादाराव टापरे, रवी करणकार, पंकज उपाध्ये, राजू वानखडे, गणेश कोथळकर, संजय पांडे यांच्या पथकाने केली.
जुगारावर छापा; आठ आरोपी अटकेत
By admin | Published: May 28, 2014 1:09 AM