शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्टिकल 370 वरून जम्मू-काश्मीर विधानसभेत गदारोळ, हाणामारी अन् पोस्टरही फाडलं; बघा VIDEO
2
"प्रमोद महाजनांच्या हत्येमागं मोठं षडयंत्र, दोन्ही भावांमध्ये भांडण नव्हतं"; पूनम महाजनांचे मोठं वक्तव्य
3
"त्रेता युगात इस्लाम नावाची कुठली वस्तूच या पृथ्वीवर नव्हती..."; अमरावतीत काय म्हणाले योगी आदित्यनाथ?
4
२०१९ मधील वचननामा, संकल्पपत्र, जाहीरनामा; किती घोषणा पूर्ण झाल्या? तुम्हीच ठरवा
5
Bigg Boss 18: 'वीकेंड का वार'मध्ये दिसणार नाही भाईजान, सलमानच्या जागी 'हे' दोन सेलिब्रिटी असणार होस्ट
6
श्रेयस अय्यरचे द्विशतक! मुंबईचा संकटमोचक सुस्साट; अजिंक्य रहाणेच्या संघाने धावांचा डोंगर उभारला
7
"उद्धवजी नेता घरात नाही, तर लोकांच्या दारात शोभून दिसतो"; बावनकुळेंनी ठाकरेंना डिवचलं
8
धुळे जिल्ह्यातील पाचही मतदारसंघात सर्व पक्षांना मत विभाजनाची भीती
9
Chitra Wagh : “राहुल गांधी तुम्हाला संविधान म्हणजे पोरखेळ वाटला का?”; भाजपाच्या चित्रा वाघ यांचा संतप्त सवाल
10
मविआतील नेत्यांच्या फोटोंचा वापर; शेकाप उमेदवारावर गुन्हा नोंदवण्याची मागणी!
11
“महाराष्ट्राला परिवर्तन हवे, जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे काम करावे लागेल”: शरद पवार
12
जंगल थीम, केक अन्...; आलिया-रणबीरच्या लेकीचा दुसरा वाढदिवस, राहाच्या बर्थडे पार्टीतील Inside फोटो
13
अर्जुन कपूर करतोय एकटेपणाचा सामना? मलायकाशी ब्रेकअपनंतर पहिल्यांदाच स्पष्ट बोलला
14
"अमेरिकन जनतेसाठी कमला हॅरिस चॅम्पियन आहेत, कायम राहतील"; जो बायडेन यांनी केलं कौतुक
15
"जिवंत राहिले तर जरूर कोर्टात जाईन", वॉरंट मिळाल्यानंतर प्रज्ञा सिंह ठाकूर यांची पोस्ट!
16
"मित्रपक्षाने अशी दगाबाजी करणं..."; भास्कर जाधवांना संताप अनावर, काँग्रेसला सुनावलं
17
राज ठाकरेंच्या मनसेला आम्ही ऑफर दिली होती, पण...; CM एकनाथ शिंदेंचा दावा
18
ऑस्ट्रेलियात Dhruv Jurel नं राखली लाज; संघ अडचणीत असताना हा पठ्ठ्या एकटा लढला!
19
ममता बॅनर्जींचा भाचा पश्चिम बंगालचा पुढील मुख्यमंत्री होणार? अचानक राजकीय चर्चांणा उधाण
20
"तुला जीवाची पर्वा आहे की नाही?”; लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने फॅशन डिझायनरला धमकी

महिलेवर सामूहिक बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2019 1:23 PM

अकोला: येवता ते मलकापूर रोडवरील एका कोरड्या खदानीत शहरातील एका ४५ वर्षीय महिलेवर पाच युवकांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना बुधवारी रात्री उशिरा घडली.

अकोला: येवता ते मलकापूर रोडवरील एका कोरड्या खदानीत शहरातील एका ४५ वर्षीय महिलेवर पाच युवकांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना बुधवारी रात्री उशिरा घडली. या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळ गाठून महिलेला उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले.या प्रकरणातील दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, इतर तीन आरोपी फरार झाले. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.एमआयडीसी परिसरात एकाच हॉटेलमध्ये काम करणाऱ्या २७ वर्षीय युवकासोबत ४५ वर्षीय महिलेचे प्रेमसंबंध जुळल्यानंतर ते दोघेही कैलास नगर परिसरात एकत्र राहत होते. मुलाकडील नातेवाइकांनी त्यांना विरोध केला; मात्र हा विरोध झुगारून त्यांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मुलाच्या मोठ्या भावाने दोघांनाही भेटून भाड्याच्या घरात राहून नका आपल्या घरी चला अशी भूलथाप देऊन तिला बुधवारी त्याच्या घरी नेण्यासाठी गेला. यावेळी त्याने सोबत तीन ते चार मित्रही नेले. महिलेला घराकडे घेऊन जात असतानाच ते येवता-मलकापूर रोडवरील अंधारातील एका खदानजवळ त्याचे मित्र थांबले होते. तेथे पोेहोचल्यावर त्या महिलेला दुचाकीवरून खाली उतरून तिला अंधारात नेले. तिथे तिच्यावर त्यांनी सामूहिक अत्याचार केला. महिलेला तिथेच सोडल्यानंतर तिला भोवळ आल्याने ती खाली कोसळली. त्यामुळे तिला उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. डॉक्टरांनी तिची वैद्यकीय तपासणी केली असता तिच्यावर अत्याचार झाल्याचे समोर आले.एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी रुग्णालयात येऊन महिलेचे बयान घेतले. घटनास्थळ पंचनामा करून त्यातील आरोपींचा शोध सुरू केला. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. यातील दोघांना ताब्यात घेण्यात आले असून, इतर तिघांचा शोध सुरू असल्याची माहिती ठाणेदार किशोर शेळके यांनी दिली. अद्यापही आरोपींची नावे जाहीर करण्यात आली नसली तरी सर्व आरोपी शिवणी येथील रहिवासी असल्याची माहिती पोलीस अधिकाºयांनी दिली.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारीGang Rapeसामूहिक बलात्कार