अकोला, दि. १४- एमआयडीसी पोलिसांनी दुचाकी चोरणार्या टोळीचा पर्दाफाश केला असून या चोरटयांकडून तब्बल १0 वर दुचाक्या जप्त करण्यात एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे. या दोन चोरट्यांना गुरूवारी दुपारी अटक करून त्यांच्याकडून चोरीच्या आठ मोटारसायकल जप्त केल्या होत्या, त्यानंतर शुक्रवारी न्यायालयाने त्यांची पोलिस कोठडीत रवानगी केली. पोलिसांनी या चोरटयांकडून आणखी दोन दुचाक्या जप्त केल्या आहे. एमआयडीसी पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे दोन दुचाकी चोरटयांना गुरुवारी ताब्यात घेतले. त्यांची कसुन चौकशी केल्यावर त्यांनी शहरातील ठिकठिकाणावरून मोटारसायकल लंपास केल्याची कबुली दिली. एमआयडीसी पोलिसांनी लहान उमरीत राहणारा रॉबिन्सन बोर्डे आणि गोरक्षण रोडवर राहणारा चेतन मनातकर यांना अटक केली. त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला. आरोपींकडून आठ मोटारसायकली जप्त केल्या आहेत. त्यानंतर शुक्रवारी आणखी दोन दुचाक्या जप्त करण्यात आल्या. त्यानंतर दोन्ही चोरटयांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपींन आरोपींकडून आणखी काही मोटारसायकल मिळण्याची शक्यता आहे. मोटारसायकल लंपास करणार्या टोळीतील सदस्य वाढण्याची शक्यता आहे. ही कारवाई शहर पोलिस उपअधिक्षक उमेश माने पाटील यांच्या मार्गदर्शनात एमआयडीसीचे ठानेदार शिरीष खंडारे, सलीम खान पठान, रवि खंडारे, संजय अंभोरे, पंकज तायडे व कर्मचार्यांनी केली.
दुचाकी चोरटयांची टोळी जेरबंद
By admin | Published: January 14, 2017 12:40 AM