अकोला: शौचालयांच्या सेप्टिक टँकमधील मैल्याचे सुरक्षित व नियमित व्यवस्थापन करून त्यावर प्रक्रिया करणे अपेक्षित असताना महापालिका प्रशासन चक्क रहिवासी वस्त्यांमध्ये उघड्यावर मैला टाक ण्याचे प्रताप करीत आहे. यामुळे सर्वसामान्य अकोलेकरांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून, संबंधित प्रभागांचे नगरसेवक अनभिज्ञ कसे, असा सवाल उपस्थित होत आहे.स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत वैयक्तिक शौचालयांची उभारणी केल्यानंतर शौचालयांच्या सेप्टिक टँकमधील मैल्याचे सुरक्षित व नियमित व्यवस्थापन करून त्यावर प्रक्रिया करण्यासाठी ‘एसटीपी’(सिवरेज ट्रीटमेंट प्लांट)ची उभारणी करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. त्यानुषंगाने मनपा प्रशासनाने निविदा प्रक्रिया राबविली असता एक निविदा अर्ज प्राप्त झाला होता. त्यानंतर हा प्लांट उभारण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आली. अर्थात, यासंदर्भात महापालिकेच्या स्तरावर गोंधळाची स्थिती असताना दुसरीकडे सर्वसामान्य अकोलेकरांच्या जीवाशी प्रशासनाने खेळ चालविला आहे. शौचालयातील मैल्याची मनपा क्षेत्राबाहेर जाऊन विल्हेवाट लावणे अपेक्षित असताना मोटार वाहन विभागाच्या संबंधित कर्मचाऱ्यांकडून चक्क रहिवासी वस्त्यांमध्ये हा मैला टाकल्या जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.प्रभाग ८ मधील नाल्यात मैलामनपाच्या मोटार वाहन विभागातील कर्मचाºयांनी शौचालयातील मैल्याची प्रभाग क्रमांक ८ मधून जाणाºया मुख्य नाल्यात विल्हेवाट लावल्याचे समोर आले आहे. जुना बाळापूर रोड परिसरातील मुख्य नाल्यात मैला टाकल्या जात असल्यामुळे परिसरातील जलस्रोत दूषित होण्याची दाट शक्यता आहे.नगरसेवक अनभिज्ञ कसे?प्रभाग क्रमांक ८ मध्ये चारही नगरसेवक भाजपचे आहेत. प्रभागातील मुख्य नाल्यात शौचालयाचा मैला टाकला जात असल्याने स्थानिक रहिवाशांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. अशावेळी सदर प्रकाराबद्दल प्रभागातील नगरसेवक अनभिज्ञ कसे, असा सवाल उपस्थित होऊन याप्रकरणी नगरसेवकांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.