या केंद्रांतून विविध प्रकारच्या सेवा दिल्या जातात. महा ई सेवा केंद्र तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरले आहे. सदर केंद्र नव्हते तेव्हा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहराच्या ठिकाणी जाऊन प्रमाणपत्र काढावे लागत. आता मात्र गावातच सर्व प्रकारची प्रमाणपत्रे मिळत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा मोठा त्रास वाचला आहे. आता याचं केंद्रातून गॅस मिळणार असल्याने गावागावांत मोठी सुविधा निर्माण होणार आहे. केंद्र शासनाकडून सेवा केंद्रांमार्फत गॅस देण्याच्या सूचना आल्या आहेत. त्यामुळे गावागावातील केंद्रांना आम्ही शंभर रुपयांच्या स्टँप पेपरवर करारनामा करून व शासनाची फी घेऊन पॉईंट दिले आहेत. या केंद्रांतून एच.पी. कंपनीचे सिलिंडर घेऊन कोणत्याही कंपनीचे सिलिंडर दिले तरी चालणार असल्याची सुविधा उपलब्ध आहे. अशी माहिती गोपाळराव जाधव यांनी दिली.
आता महा-ई-सेवा-सीएससी केंद्रांमार्फत गॅस विक्री !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 4:23 AM