अकोला : रेल्वे स्टेशनच्या समोरील परिसरात संशयास्पदरीत्या फिरत असलेल्या एका इसमास रामदास पेठ पोलिसांनी रविवारी मध्यरात्री ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याच्याकडून ४१७ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. त्यानंतर आरोपीस न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला. रेल्वे स्टेशन परिसराच्या समोर सुरेश भिकाजी मेश्राम हा संशयास्पदरीत्या फिरत होता. रामदास पेठ पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन झाडाझडती घेतली असता त्याच्याजवळ ४१७ ग्रॅम गांजा आढळून आला. रामदास पेठ पोलिसांनी सुरेश मेश्राम याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. सोमवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपी सुरेश मेश्राम याचा जामीन मंजूर केला.
४१७ ग्रॅम गांजासह आरोपी गजाआड
By admin | Published: August 12, 2015 1:34 AM