अकोला: मुंबईतील नायर हॉस्पिटलच्या वसतिगृहात डॉ. पायल तडवी हिचा रॅगिंगद्वारे प्रचंड छळ केल्यानेच तिने आत्महत्या केली असून, याप्रकरणी दोषी असणाºया तीनही महिला डॉक्टरांना कठोर शिक्षा करण्याची मागणी करीत गुरुवारी कौलखेडवासी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. या प्रकरणातील तीन महिला आरोपींमध्ये अकोल्यातील अंकिता खंडेलवालचा समावेश असून, सदर खटला जलदगती न्यायालयात चालविण्याची मागणी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.तीन महिला डॉक्टरांनी तिचा छळ करीत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा प्रकार उघडकीस आल्यामुळे संबंधित महिला डॉक्टरांविरोधात आग्रीपाडा पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटी, रॅगिंगविरोधी कायदा आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यातील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. सदर खटला जलदगती न्यायालयात चालवून पायल तडवी हिच्या मारेकºयांना कठोर शिक्षा देण्याची मागणी कौलखेडवासीयांकडून करण्यात आली. निवेदन सादर करताना प्रकाश तायडे, वासुदेव तेलगोटे, वसंत अहिर, अभिजित तायडे, सागर तायडे, मिलिंद इंगळे, गोपाल राजपूत, अमोल डोंगरे, अनिरुद्ध वानखडे, विजय काळे, रजनी अहिर, सुनीता सोनोने, सविता खंडारे, सविता गोपनारायण, पुष्पलता अंभोरे, अन्नपूर्णा इंगळे, प्रिया इंगळे, शीला खंडेराव, प्रीती भगत, आकाश चापके, बाबूलाल निखाडे, बाबाराव साखरे, प्रवीण निखाडे, योगेश जायले, किरण इंगळे, चंद्रमणी आठवले, प्रशांत उमक व आकाश भगत उपस्थित होते.आदिवासी संघटना सरसावल्या!डॉ. पायल तडवी यांच्या आत्महत्येप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई व्हावी, यासाठी जिल्ह्यातील आदिवासी संघटना सरसावल्या आहेत. गुरुवारी जिल्हाधिकाºयांना राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद, अंध आदिवासी विकास महासंघ मलकापूर (अकोला) यांच्यावतीने निवेदन सादर करण्यात आले.