मूळ नियुक्तीच्या प्रस्तावाची पडताळणी कधी?
लाेकप्रतिनीधींच्या निर्देशानंतर मनपाने समायोजनाच्या प्रक्रियेसाठी हालचाली सुरू करीत कर्मचाऱ्यांच्या मूळ नियुक्तीच्या प्रस्तावांची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला हाेता़ त्यासाठी समितीचे गठन करण्यात आले हाेते़ या समितीला महिनाभरात अहवाल सादर करण्याचे निर्देश होते. आजपर्यंतही या समितीने कर्मचाऱ्यांचा अहवाल प्रशासनाकडे सादर केला नसल्याची माहिती आहे़
सत्तापक्षाचा कानाडाेळा; आयुक्तांकडून अपेक्षा
विधानसभा निवडणुकीतील राजकीय समीकरणे व बांधकाम व्यावसायिकांचे हित डाेळ्यासमाेर ठेवून भाजपने मनपा हद्दवाढीचा मुद्दा तत्कालीन युती सरकारकडे लावून धरला हाेता. सप्टेंबर २०१६ मध्ये हद्दवाढ झाल्यानंतर सत्ताधारी भाजपने हद्दवाढ क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या रास्त मागणीकडे दुर्लक्ष केल्याचे समाेर आले आहे. या कर्मचाऱ्यांना तुटपुंज्या मानधनात कामकाज करावे लागत असून ही प्रशासकीय बाब मनपा आयुक्त निमा अराेरा यांनी मार्गी लावावी, अशी मागणी समितीच्यावतीने अध्यक्ष विठाेबा दाळू, सचिव प्रशांत देशमुख यांनी केली आहे़