शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दिकी हत्या : एका आरोपीला पोलीस कोठडी, तर दुसऱ्याला..., न्यायालयाचा आदेश काय?
2
Baba Siddique : "२०१९ ला जेलमध्ये गेला, जामीन कसा मिळाला माहीत नाही; ११ वर्षांपूर्वीच घरातून हाकलून दिलं"
3
"उद्धव ठाकरे, सारखं वाघनखं काढतंय; एकनाथ शिंदे, ते एक पुष्पा वेगळंच"; राज ठाकरे बरसले
4
मोदींच्या 'त्या' विधानावर शरद पवारांनी ठेवलं बोट; म्हणाले, "आम्ही बदनामी करू इच्छित नाही, पण..."
5
"मी तुमचा चित्रपट बनवेन - एक था MLA", दाऊद इब्राहिमनं एकदा बाबा सिद्दिकींना दिली होती धमकी
6
"धानाला हेक्टरी २५ हजार रुपये बोनस देणार", देवेंद्र फडणवीसांची ग्वाही
7
"मी त्यांना कधीही हसताना..."; रतन टाटांच्या निधनाच्या तीन दिवसानंतर शंतनु नायडूंनी केली भावूक पोस्ट
8
"मला एक खून माफ करा...", राज ठाकरेंची थेट राष्ट्रपतींकडे विनंती; मेळाव्यात असं का म्हणाले?
9
Baba Siddique : "पुण्याला जातो सांगितलं, माझा मुलगा..."; बाबा सिद्दिकींची हत्या करणाऱ्या शिवाच्या आईची प्रतिक्रिया
10
'या लोकांना संपूर्ण देशात गुंडा राज आणायचे आहे', बाबा सिद्दिकी हत्याकांडावर केजरीवाल संतापले
11
"गृहमंत्र्यासोबत मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आम्ही नाकारत नाही"; बाबा सिद्दिकींच्या हत्येवरुन शिंदे गटाचे मंत्री स्पष्टच बोलले
12
झोपडीत राहिला, ४० रुपयांसाठी केली मजुरी; पंचायत फेम अभिनेत्याने सांगितला संघर्षमय काळ
13
'या' टॉप 5 इलेक्ट्रिक स्कूटर ऑनलाइन खरेदी करु शकता, मिळेल मोठा डिस्काउंट!
14
गंभीर घटना घडल्यानंतरही त्यांच्या नजरेसमोर फक्त खुर्ची आहे; फडणवीसांचे शरद पवारांना प्रत्यूत्तर
15
Baba Siddique Shot Dead : बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी बिश्नोई टोळीने घेतली; म्हणाला, "सलमान खान, आम्हाला हे युद्ध..."
16
सगळे थिएटर रिकामी! 'जिगरा' बघायला गेलेल्या अभिनेत्रीचे आलियावर आरोप, म्हणाली- "तिने स्वत:च तिकिटं खरेदी करून..."
17
Baba Siddique Shot Dead :'पोलिसांना फ्री हॅन्ड दिला पाहिजे, ही मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांची जबाबदारी'; छगन भुजबळ थेटच बोलले
18
मजुरी करायला पुण्यात आले, तिसऱ्याची ओळख झाली; मग घेतली बाबा सिद्दिकींच्या हत्येची सुपारी
19
"रेल्वे अपघात तर होतच राहतात"; केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान, लोकांनी व्यक्त केला संताप
20
लॉरेन्स बिश्नोई दाऊदच्या वाटेवर; ७०० शूटर्स, ६ देशांमध्ये गुन्हेगारीचे साम्राज्य, NIA कडून आरोपपत्र

लोकशाही आघाडीपासून सुटका करा!

By admin | Published: May 03, 2017 1:22 AM

भारिप-बमसंची विभागीय आयुक्तांकडे तक्रार

अकोला : महापालिकेत स्थायी समिती सदस्य निवड प्रक्रियेतून डच्चू दिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसप्रणीत लोकशाही आघाडीपासून सुटका करण्याची विनंतीवजा तक्रार भारिप-बहुजन महासंघाने विभागीय आयुक्तांकडे केली आहे. भारिपच्या भूमिकेमुळे महापालिकेच्या राजकीय वर्तुळात मोठे फेरबदल होतील, हे जवळपास निश्चित झाले आहे. महापालिकेच्या राजकारणात अस्तित्व टिकविण्यासाठी काही राजकीय पक्षांची धावपळ सुरू आहे, तर दुसरीकडे मनपातील वातावरण अस्थिर ठेवण्यासाठी प्रमुख राजकीय पक्ष पडद्याआडून खेळ्या करीत असल्याचे चित्र आहे. स्थायी समितीसाठी पक्षातील नगरसेवक तसेच स्वीकृत सदस्य पदावर कार्यकर्त्यांची वर्णी लागावी, याकरिता अपेक्षित संख्या बळाचे गणित जुळवून राष्ट्रवादी काँग्रेसने भारिप-बमसंच्या तीन व एमआयएमच्या एका नगरसेवकाला सोबत घेऊन एकूण नऊ सदस्यांची लोकशाही आघाडी गठित केली. लोकशाही आघाडीच्या ठरलेल्या समीकरणानुसार स्थायी समितीसाठी एक सदस्य राष्ट्रवादीचा व दुसरा एक सदस्य भारिपमधून निवडण्यावर सहमती झाल्याचे बोलल्या जाते. स्थायी समिती सदस्यांची निवड झाली, त्या दिवशी राकाँने सादर केलेल्या लिफाफ्यातून भारिपच्या नगरसेवकाचे नाव वगळल्याचा प्रकार समोर आला. या प्रकाराची भारिप-बमसंचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी गंभीर दखल घेत लोकशाही आघाडीतून बाहेर पडण्याचा मनपातील गटनेत्या अ‍ॅड. धनश्री देव यांना आदेश दिला. त्यानुषंगाने अ‍ॅड. देव यांनी लोकशाही आघाडीतून बाहेर निघण्यासाठी विभागीय आयुक्त अमरावती यांच्याकडे तक्रार दाखल केली असून, त्याची प्रतिलिपी मनपा आयुक्त कार्यालयात सादर केली आहे.‘स्वीकृत’च्या राजकारणाला कलाटणीमनपाच्या सभागृहात एकूण पाच स्वीकृत सदस्यांची निवड केली जाईल. स्वीकृत सदस्य पदासाठी भाजपच्या गोटातून तीन जणांची वर्णी लागेल. त्यापाठोपाठ काँग्रेसकडून एका सदस्याची निवड केली जाईल. उर्वरित एका सदस्याच्या निवडीसाठी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चुरस रंगल्याचे चित्र होते. शिवसेनेने आघाडी स्थापन करताना अपक्ष नगरसेवक जकाऊल हक यांना सोबत घेऊन नऊ जणांची आघाडी स्थापन केली. दुसरीकडे राकाँने भारिप व एमआयएमला सोबत घेऊन नऊ जणांची आघाडी गठित केली. आता लोकशाही आघाडीतून बाहेर पडण्यासाठी भारिपने पाऊल उचलल्यानंतर राकाँच्या लोकशाही आघाडीची सदस्य संख्या केवळ सहा होईल. अर्थात, स्वीकृत सदस्य पदासाठी शिवसेनेचा मार्ग आपसूकच मोकळा झाल्याचे तूर्तास दिसून येते. भाजपची अपरिहार्यता!स्वीकृत सदस्य पदासाठी शिवसेनेला डावलून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याची वर्णी लागावी, यासाठी पडद्यामागून भाजपने सूत्रं हलविल्याचे बोलल्या जाते. भारिप-बमसंने राकाँच्या लोकशाही आघाडीच्या विरोधात घेतलेली भूमिका पाहता सभागृहात शिवसेना आघाडीने सुचविलेल्या सदस्याच्या नावावर भाजपला शिक्कामोर्तब करावे लागेल, असे दिसून येते.