उमरा येथे १०६ शौचालयांची रंगरंगोटी करण्यासाठी १ लाख ८० हजार २०० रुपये ग्रामपंचायतच्या सामान्य फंडमध्ये जमा होते. प्रती शौचालय १,७०० रुपयेप्रमाणे राजे पेन्टर ग्रुप कावसाच्या भास्कर शंकरराव लटुरे यांना कंत्राट देण्यात आला. ४० शौचालय रंगरंगोटी खर्च केल्याचे अहवालामध्ये ६८ हजार हजार रुपये वसूल पात्र ठरते. त्यामुळे सदर वसूलपात्र रक्कम ६८ हजार रुपये समप्रमाणे तत्कालीन सरपंच ग्रामविकास अधिकारी एस. जे. उईके यांच्याकडून वसूल करणे आवश्यक आहे. शौचालय रंगरंगोटीचे कामे नियमाप्रमाणे दर्जात्मकदृष्ट्या योग्य झाले नसल्याचे अहवालात दिसून येते. त्या ४० शौचालयास रंगरंगोटी केलेल्या शौचालयाचे पैसे काढल्याचे समोर आले. रंगरंगोटी चौकशी विस्तार अधिकारी घुगे यांनी केली; मात्र अद्यापही चौकशी अहवाल अर्धवट असल्याचा आरोप तक्रारकर्ते प्रभुदास खवले यांनी केला आहे. उमराचे ग्रामसेवक एस. जे. उईके यांनी चौदाव्या वित्त आयोगामार्फत केलेले पेवर ब्लॉक निकृष्ट दर्जाचे वापरले. पेवरचे बिल कोणत्या आधारावर काढले. गैरप्रकार झाल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्यांनी केला होता. याचीसुद्धा चौकशी करण्यात आली नाही. या गंभीर बाबीकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे. या संदर्भात विस्तार अधिकारी घुगे यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
प्रशासनाने चौकशी केली; परंतु चौकशी अहवालात ग्रामसेवक, सरपंचाला वाचविण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पुन्हा चौकशी करून दोषींविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी.
प्रभुदास खवले, तक्रारकर्ते