शहरातील जुन्या आरटीओ रोडवरील हनुमान मंदिराच्या पुढे असलेल्या स्वप्नशिल्प अपार्टमेंटच्या पहिल्या मजल्यावर ६० वर्षीय सरोबाई कांडेलकर आणि तिची विधवा मुलगी कविता बावसकर (४०) ह्या राहतात. कविताचा मुलगा पुण्यातील एका इंजिनिअरींग कॉलेजचा विद्यार्थी आहे. बुधवारी सायंकाळी उशिरा आई-मुलीमध्ये पैशांच्या देवाण-घेवाणीच्या कारणावरून वाद झाला. रागाच्या भरात कविताने तिच्या आईचे डोके दगडाच्या पाट्यावर वारंवार आपटून तिला ठार केले. रक्ताने माखलेल्या सरुबाईचा जागीच मृत्यू झाला. या रक्तरंजित घटनेची माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे निरीक्षक डी. सी. खंडेराव आणि पोलिसांच्या गुन्हे शाखेचे शैलेश सपकाळ हे त्यांच्या पथकासह घटनास्थळी पोहोचले. पंचनाम्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात आला. मृतक महिलेची मुलगी कविता बावसकर हिला संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले व तपास सुरू केला. कविता बावसकरने दिलेल्या जबाबात सांगितले की, तिनेच तिच्या आईची हत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली. रात्री उशिरा कलम ३०२ नुसार हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पाट्यावर डोके आपटून मुलीने केली आईची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 4:33 AM