शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
3
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
4
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
5
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
7
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
8
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
9
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
10
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
11
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
12
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
13
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
14
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
15
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
16
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
18
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
19
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
20
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप

वडिलांची हत्या करून मृतदेह बॅगेत नेणारी मुलगी, जावई गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 2:09 AM

अकोला : जन्मदात्या पित्याची हत्या करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याचे तुकडे करून ते एका बॅगेत घेऊन जाणार्‍या मुलीला व जावयाला अकोला रेल्वे पोलिसांनी सोमवारी रात्री पकडले होते. त्या दोघांनाही रेल्वे पोलिसांनी नागपूर येथील प्रताप नगर पोलिसांच्या हवाली केले. 

ठळक मुद्देनागपूर पोलिसांच्या दिले ताब्यातअकोल्यात केली अटक

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जन्मदात्या पित्याची हत्या करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याचे तुकडे करून ते एका बॅगेत घेऊन जाणार्‍या मुलीला व जावयाला अकोला रेल्वे पोलिसांनी सोमवारी रात्री पकडले होते. त्या दोघांनाही रेल्वे पोलिसांनी नागपूर येथील प्रताप नगर पोलिसांच्या हवाली केले. मानसिंग कुंवरसिंग शिव (५५) रा. प्रताप नगर, दुर्गामाता मंदिराजवळ नागपूर, असे मृतकाचे नाव आहे. त्यांचा मृतदेह त्यांची मुलगी किरण व तिचा पती विजय अशोक तिवारी रा. बुलडाणा हे एका मोठय़ा सुटकेसमधून रेल्वे स्थानकाच्या दिशेने ऑटोतून घेऊन जात होते; मात्र सुटकेसमधून दुर्गंंधी आल्याने ऑटोचालकाने पोलिसांना फोन केला. त्याचा संशय आल्याने किरण व विजय दोघेही पळून गेले. पोलिसांना सुटकेसमध्ये मानसिंग यांचा मृतदेह दिसून आला. मुलगी व जावई मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या बेतात असल्याचा संशय पोलिसांना आल्याने त्यांनी अकोला रेल्वे पोलीस ठाण्याचे ठाणेदार एस. डी. वानखडे यांना माहिती दिली. त्यावरून ठाणेदार यांनी विदर्भ एक्स्प्रेसमधून मुलगी व जावयाला पकडले. त्याची माहिती त्यांनी नागपूर पोलिसांना दिली. मंगळवारी सकाळी नागपूर पोलीस अकोल्यात आले आणि आरोपी मुलगी व जावई याला अटक करून निघून गेले.

टॅग्स :Crimeगुन्हा