लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : मूर्तिजापूर येथील डॉ. राजेश कांबे पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँण्ड टेलिकम्युनिकेशन अभ्यासक्रमाला शिक्षण घेणार्या विद्यार्थिनीवर राजेश कांबे यांचा मुलगा संकेत कांबे यानेच बलात्कार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. शिक्षण बंद करण्याची तसेच बदनामी करण्याची धमकी व लग्नाचे आमिष देऊन वारंवार बलात्कार केल्यानंतरही या आरोपीस मूर्तिजापूर पोलिसांनी ‘अर्थ’कारणातून अटक केली नसल्याचा आरोप पिडीत विद्यार्थिनीने मंगळवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला. तसेच या आशयाचे निवेदन तिने जिल्हा पोलीस अधीक्षकांनाही दिले आहे.पडित विद्यार्थिनीने पत्रकार परिषदेत सांगीतले की, तीने २0१0 मध्ये मूर्तिजापूर येथील डॉ. राजेश कांबे पॉलिटेक्निक कॉलेजला प्रवेश घेतला होता. ती प्रतीक नगर येथे भाड्याने खोली करून राहत होती. शिवाजी नगरातील रहिवासी सागर पुंडकर याच्याशी तीचा परिचय होता. पुंडकर सोबतच संकेत कांबे राहत होता. ती पुढे म्हणाली की, संकेत हा बीडीएस वैद्यकीय शिक्षण घेत आहे. सागर पुंडकर याच्याशी मैत्री असल्याने त्याच्यासोबत राहणार्या संकेत कांबे याच्याशी ओळख होती. या ओळखीतून संकेत कांबे याने तीला नोट्स मागितल्या. या विद्यार्थिनीने त्याला नोट्स दिल्यानंतर त्यांची मैत्री झाली. एप्रिल २0११ मध्ये संकेत कांबे याने तीला घरी जेवणाचे आमंत्रण देऊन सोबत नेले आणि घरी कुणीही नसल्याची संधी साधत तिच्याशी जबरी संभोग केल्याचा आरोप तीने केला. या प्रकाराबाबत तीने आई-वडिलांना सांगण्याची धमकी दिली असता संकेत कांबे याने तिचे मूर्तिजापुरातील शिक्षण बंद करण्याची धमकी दिली. त्यानंतर लग्नाचे आमिष दिले. या आमिषाला बळी पडल्यानंतर कांबेने तीच्यावर शेगाव येथील गेस्ट हाउसवर, नागपूरमधील फ्लॅटवर, त्यानंतर डिसेंबर २0११ मध्ये पुण्यातील एका हॉटेलमध्ये लैंगिक अत्याचार केल्याचेही तीने पत्रकार परिषदेत सांगीतले. या प्रकारानंतर एप्रिल व जुलै २0१७ मध्ये शेगाव आणि मूर्तिजापुरात त्याने लग्नाचे आमिष दाखवित तिचे पुन्हा लैंगिक शोषण केले. यामध्ये तीला गर्भधारणाही झाल्याने त्याने गर्भपाताच्या औषधी देऊन तिचा गर्भपात केल्याचेही ती पत्रकार परिषदेत म्हणाली ; एवढे सर्व झाल्यानंतरही संकेत कांबे याने आता दुसर्याच मुलीशी विवाह करण्याचे नियोजन केले आहे. या प्रकरणी तीने ुिदलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी संकेत कांबे याच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३७६ (२) व ५0६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. मात्र मूर्तिजापूर पोलीसही त्याला अभय देत असल्याचा आरोप तीने पत्रकार परिषदेत केला आहे.या पत्रकार परिषदेतला रिपाइं सेनेचे जिल्हाप्रमुख देवेश पातोडे, एनएसयुआय जिल्हाध्यक्ष आकाश कवडे, रिपाई सेनेचे शहर प्रमुख संदेश गायकवाड, संतोष गवई, राहुल सारवान, अभि गायकवाड आदी उपस्थित होते.