शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

शासकीय वसतिगृहातील मुलींना वर्षभरापासून मिळाला नाही भत्ता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 2:04 PM

अकोला : शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलींच्या वसतिगृहातील विद्यार्थिनींना गेल्या वर्षभरापासून स्टेशनरी भत्ता, ड्रेसकोड भत्ता मिळाला नाही.

- संतोष येलकर

अकोला : शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलींच्या वसतिगृहातील विद्यार्थिनींना गेल्या वर्षभरापासून स्टेशनरी भत्ता, ड्रेसकोड भत्ता मिळाला नाही. यासोबतच गत फेबु्रवारीपासून निर्वाह भत्तादेखील मिळाला नाही. विद्यार्थिनी भत्त्याच्या लाभापासून वंचित असताना, यासंदर्भात तक्रारींकडे मात्र सामाजिक न्याय विभागाच्या सहायक आयुक्तांकडून टाळाटाळ केली जात असल्याचे वास्तव समोर आले आहे.शासनाच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत शासकीय वसतिगृहातील इयत्ता अकरावी ते पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना प्रतिवर्ष स्टेशनरी भत्ता, ड्रेसकोड भत्ता आणि दरमहा निर्वाह भत्ता दिला जातो; परंतु अकोल्यातील संतोषी माता मंदिराजवळील डॉ.बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलींच्या वसतिगृहातील विद्यार्थिनींना सन २०१७-१८ या वर्षातील स्टेशनरी भत्ता, ड्रेसकोड भत्ता अद्याप मिळाला नाही, तसेच दरमहा मिळणारा निर्वाह भत्ता गेल्या फेबु्रवारीपासून मिळाला नाही. भत्ता रकमेच्या लाभापासून वसतिगृहातील मागासवर्गीय विद्यार्थिनी वर्षभरापासून वंचित असताना, या समस्येसंदर्भात करण्यात आलेल्या तक्रारींकडे सामाजिक न्याय विभागाच्या सहायक आयुक्तांकडून टाळाटाळ केली जात आहे.विद्यार्थिनींना असा दिला जातो भत्ता !सामाजिक न्याय विभागांतर्गत शासकीय वसतिगृहातील विद्यार्थिनींना प्रती वर्ष प्रत्येकी स्टेशनरी भत्ता ४ हजार रुपये, ड्रेसकोड भत्ता दोन हजार रुपये आणि दरमहा निर्वाह भत्ता ७०० रुपये दिला जातो; परंतु गत वर्षभरापासून शासकीय वसतिगृहातील विद्यार्थिनींना स्टेशनरी भत्ता व ड्रेसकोड भत्त्याची रक्कम मिळाली नाही.शासकीय मुलींचे वसतिगृहातील विद्यार्थिनींना वर्षभरापासून स्टेशनरी, ड्रेसकोड भत्ता मिळाला नाही. निर्वाह भत्तादेखील फेबु्रवारीपासून प्रलंबित आहे. यासंदर्भात प्राप्त तक्रारीनुसार, सामाजिक न्याय विभागाच्या सहायक आयुक्तांकडे तक्रारी मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र त्याकडे सहायक आयुक्तांकडून टाळाटाळ केली जात आहे. संबंधित समस्यांचे तातडीने निवारण करण्यात यावे, अन्यथा आंदोलन करण्यात येणार आहे.- अमोल सिरसाटजिल्हाध्यक्ष, सम्यक विद्यार्थी आंदोलन, अकोला.शासकीय वसतिगृहातील विद्यार्थिनींना दिला जाणारा स्टेशनरी भत्ता, ड्रेसकोड भत्ता निधीअभावी वर्षभरापासून प्रलंबित आहे. समाजकल्याण आयुक्तालयाकडून निधी प्राप्त झाल्यानंतर भत्त्याची रक्कम विद्यार्थिनींच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. मागील महिन्यापर्यंत निर्वाह भत्त्याची रक्कम देण्यात आली आहे.-अमोल यावलीकर, सहायक आयुक्त, सामाजिक न्याय विभाग, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाStudentविद्यार्थी