तेल्हारा तालुक्यातील तळेगाव पातुर्डा येथील निवेदनकर्ते नागरिक शासनाच्या घरकुल योजनेपासून वंचित आहेत. सद्यस्थितीत त्यांच्या घराची अवस्था घरात राहण्यासारखी नसून त्यांना घराची नितांत आवश्यकता आहे; मात्र शासनाचे त्यांच्या घराच्या अवस्थेकडे दुर्लक्ष होत आहे. कुणाच्या घरावर ताडपत्री टाकलेली आहे तर काहींचे घरे कुडाचे व टीन पत्र्यांचे आहेत. अशाही परिस्थितीत गरजवंताला घरकुल का मिळत नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पडझड होत असलेली आमची घरे, शासनाने घरकुल योजनेच्या माध्यमातून घरकुलाचा आम्हाला लाभ घ्यावा, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. १५ दिवसांच्या आत मागणीकडे लक्ष न दिल्यास आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. सदर निवेदनावर पुरुषोत्तम पाचपोर, कस्तुराबाई फोकमारे, वनिता पोहरकार, बाळू बावणे, अर्जुन इंगळे, सुमन डाबेराव, नारायण तायडे यांच्यासह अनेक नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
फोटो: