अकाेला : कोरोनामुळे विधवा महिला व त्यांच्या बालकांसाठी वात्सल्य उपक्रम सुरू करण्याचा निर्णय यशोमती ठाकूर यांनी अतिशय तळमळीने व युद्धपातळीवर घेतला आहे, ही अतिशय समाधानाची बाब असून, या विधवा महिलांना संजय गांधी निराधार योजना तसेच अन्य योजनांचा लाभ मिळेल. निराधार महिलांसाठी रोजगार निर्मिती व उपजीविकेसाठी मदत देण्याच्या दृष्टीकोनातून निर्णय घ्यावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते डॉ. सुधीर ढोणे यांनी त्यांची भेट घेऊन केली. यावेळी काेराेनाकाळात त्यांनी घेतलेल्या निर्णयाबाबत त्यांचा सत्कारही केला.
राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी विधवा, घटस्फोटीत महिलांसाठी तसेच त्यांच्या मुलांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी सुरू केलेल्या योजना पाहता त्यांनी हा विषय संवेदनशिलपणे हाताळला असल्याचे स्पष्ट हाेते, असे सांगत डाॅ. ढाेणे यांनी निराधार मुले व महिलांच्या पुनर्वसनासाठी विविध विभागांच्या योजनांची सांगड घालण्यात यावी, अशी मागणी केली. यावेळी काँग्रेसच्या सोशल मीडियाचे जिल्हाध्यक्ष भूषण ताले पाटील, दिलीप लोडम आदी उपस्थित हाेते.