अकोला: कोरोना विषाणूचा वाढता फैलाव रोखण्यासाठी अकोला शहरासह ॲक्टिव्ह रुग्ण असलेल्या गावांत कोरोना चाचणीत व्यापारी व दुकानदारांचे स्वॅब नमुने घेण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. त्यामध्ये स्वॅब न देणाऱ्यांची दुकाने ‘सील’ करण्याची कारवाई करण्यात येणार आहे, असा इशारा अकोल्याचे उपविभागीय अधिकारी (एसडीओ) निलेश अपार यांनी सोमवारी दिला.
जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यामध्ये अकोला शहरासह कोरोनाचे ॲक्टिव्ह रुग्ण असलेल्या तालुक्यातील गावांमध्ये कोरोना चाचणी घेण्याची विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने व्यापारी, दुकानदार व त्यांचे कामगार, कर्मचाऱ्यांचे स्वॅब घेण्यात येत आहेत. कोरोना चाचण्यांसाठी व्यापारी, दुकानदार व कामगारांनी संबंधित पथकांना स्वॅब नमुने देण्यास सहकार्य करावे. अन्यथा स्वॅब न देणाऱ्यांची दुकाने ‘सील’ करण्याची कारवाई करण्यात येणार आहे, असा इशारा अकोल्याचे उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी निलेश अपार यांनी दिला.
कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी अकोला शहर व ॲक्टिव्ह रुग्ण असलेल्या गावांमध्ये कोरोना चाचण्या घेण्याची विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये स्वॅब न देणाऱ्या व्यापारी, दुकानदारांची दुकाने ‘सील’ करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.
-डॉ.निलेश अपार
उपविभागीय अधिकारी, अकोला