अकाेला : देशात काेराेनाचा फैलाव हाेण्यास पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी आयाेजित केलेल्या ‘नमस्ते ट्रम्प’ व जय शाह यांच्या ‘नमस्ते स्टम्प’ या कार्यक्रमांचाच हातभार आहे, असा आराेप करीत काेराेनामुळे लागलेल्या लाॅकडाऊनमध्ये मजुरांची काेणतीही काळजी घेतली गेली नाही. त्यामुळे त्यांना घरापर्यंत जाण्यासाठी माेफत तिकिटे देणे ही काँग्रेसची मानवता आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते डॉ. सुधीर ढोणे यांनी केले आहे. डाॅ. ढाेणे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे की, राहुल गांधी यांनी १२ फेब्रुवारी २०२० रोजी देशात कोरोना येण्याची भीती व्यक्त केली असताना पंतप्रधान मोदींनी त्यानंतरही २४ व २५ फेब्रुवारी २०२० रोजी गुजरातमधील अहमदाबाद येथे लाखो लोकांच्या उपस्थितीत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठी ‘नमस्ते ट्रम्प’ हा कार्यक्रम आयोजित केला होता. दुसरीकडे अहमदाबाद येथील क्रिकेट स्टेडियमवर अमित शाह यांचे पुत्र जय शाह यांनी ‘नमस्ते स्टम्प’ हा कार्यक्रम आयोजित केला होता. जगातील सर्वांत मोठे स्टेडियम असलेल्या मैदानावर हा कार्यक्रम आयोजित केल्याने या कार्यक्रमानंतर कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली होती, असा आरोप डॉ. सुधीर ढोणे यांनी केला आहे.
माेफत तिकीट देणे ही काँग्रेसची मानवता- सुधीर ढोणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2022 12:40 PM