रामदासपेठ पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक सुरेंद्र राऊत व डी.बी. पथकातील कर्मचाऱ्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार त्यांनी सुभाष चौक परिसरात नाकाबंदी करून सापळा रचला. याच दरम्यान एमएच ३० बीडी २८२२ क्रमांकाचे वाहन सुभाष चौकाकडे येत असताना वाहन चालकाने पोलिसांना पाहून वाहन थांबविले आणि तेथून पळ काढला. यावेळी पोलिसांनी या वाहनाची पाहणी केली असता, त्यामध्ये आठ गोवंश कोंबून ठेवल्याचे आढळून आले. या कारवाईत पोलिसांनी १ लाख ६० हजार रुपये किमतीचे गोवंश तसेच ४ लाख रुपयांचे वाहन, असा एकूण ५ लाख ६० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पसार झालेल्या आरोपीविरुद्ध रामदास पेठ पोलीस ठाण्यात कलम ५ (अ), ५ (ब) , ९ प्राणी संरक्षण अधिनियम सहकलम ११ प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम, पोलीस निरीक्षक विलास पाटील यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक सुरेंद्र राऊत व रामदास पेठ पोलीस ठाण्याच्या डी. बी. पथकाने केली.
आठ गोवंशांना जीवनदान; आरोपी फरार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 4:15 AM