अकोला: शेतकऱ्यांच्या पिकाला सरकार हमीभाव देत नाही. कृषिप्रधान देशाचा कणा असलेल्या शेतकºयांच्या समस्या समजून घेतल्या जात नाही. पाच महिन्यांपासून ज्या राज्यात कृषी मंत्री नाही, त्या राज्यातील शेतकºयांची अवस्था काय असेल, असा प्रश्न उपस्थित करीत स्वामीनाथन आयोग लागू करण्याचे आश्वासन केवळ भूलथापा आहे, असे मत भाजपला सोडचिठ्ठी देणारे आमदार आशिष देशमुख यांनी व्यक्त केले. शेतकरी जागर मंचच्यावतीने आयोजित २३ आक्टोबर रोजी कासोधा परिषदेच्या जगजागृतीसाठी ते शनिवारी अकोल्यात आले होते. शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी विविध विषयांवर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी कृष्णा अंधारे, प्रशांत गावंडे, बबनराव चौधरी, पुंडलिकराव अरबट, दत्ता देशमुख, अशोक पटोकार, डॉ. जाधव, रवी अरबट, गजानन हरणे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.मागील वर्षी डिसेंबर महिन्यात अकोल्यात माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात पहिली कासोधा परिषद पार पडली. तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकºयांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. या घटनेला दहा महिने उलटून गेले, तरी काहीही झाले नाही. त्यामुळे अकोल्यात दुसरी कासोधा परिषद २३ आॅक्टोबर रोजी घेतली जात आहे. यासाठी यशवंत सिन्हा पुन्हा येणार आहेत. सोबतच भाजपचे माजी खासदार शत्रुघ्न सिन्हा, काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, कुमार केतकर, दिनेश त्रिवेदी, संजय सिंग, आमदार बच्चू कडू, शंकर अण्णा धोंडगे, रविकांत तुपकर प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती येथे दिली गेली. अकोला जिल्ह्यातील उगवा, भांबेरी, कुटासा, सौंदळा येथील शेतकºयांमध्ये जनजागृती करण्यासाठी देशमुख अकोल्यात शनिवारी आले होते. जिल्ह्यातील कानाकोपºयात जनजागृती करण्याचे कार्य शेतकरी जागर मंच करीत आहे. भाजपने कोणतेही आश्वासन पूर्ण केले नाही. उलटपक्षी महागाई वाढवून रोजगार हिरावून नेला. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपला जबर फटका सहन करावा लागणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, भारिपला चांगले दिवस आहेत, असे मतही देशमुख यांनी व्यक्त केले.