अकोला: महानगरात अक्षय तृतीया दिनाच्या पूर्वसंध्येवर गुरुवारी बहुभाषिक ब्राह्मण समाजाच्या वतीने भगवान परशुराम यांची भव्य शोभायात्रा काढण्यात आली.सायंकाळी खोलेश्वर येथील भगवान परशुराम चौकातील परशुराम मंदिरापासून या शोभायात्रेचा भगवान परशुरामाची पूजा-अर्चना करून आ. गोवर्धन शर्मा, शोभायात्रा संयोजन समिती अध्यक्ष रवी मिश्रा, राजस्थानी ब्राह्मण समाज संघटनेचे अध्यक्ष संजय शर्मा नर्सरी, उत्तर भारतीय ब्राह्मण समाज अध्यक्ष विष्णुदत्त शुक्ला, महाराष्ट्रीयन ब्राह्मण समाज अध्यक्ष उदय महा, गुजराती ब्राह्मण समाजाचे अध्यक्ष हितेश मेहता, नगरसेवक हरीश अलिमचंदानी, नगरसेविका उषा वीरक, अजय शर्मा, जानवी डोंगरे, शीतल रूपारेल व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत या भव्य शोभायात्रेस प्रारंभ करण्यात आला.आकर्षक रथात भगवान परशुरामांची भव्य प्रतिमा विराजमान करून दिंडी, ढोल-ताशांच्या गजरात आकर्षक देखाव्यांनीयुक्त असंख्य समाज बांधवांसमवेत ही शोभायात्रा चित्रा चौक, सिटी कोतवाली, मोठे राम मंदिर, टिळक मार्ग, जुने कापड बाजार, भाजी बाजार मार्ग गांधी चौकात येऊन येथून तहसील चौक, वसंत टॉकीज मार्गाने परत खोलेश्वर येथील भगवान परशुराम चौकात येऊन या ठिकाणी मोठ्या भक्तिभावात या शोभायात्रेचे पुरोहित वर्गाच्या सामूहिक आरतीने समापन करण्यात आले. शोभायात्रा मार्गावर अनेक सामाजिक संस्था व मंडळांनी या शोभायात्रेचे जल्लोषात स्वागत करून यात्रेकरूंना ठिकठिकाणी शीतपेये व मिष्ठान्नाचे वितरण केले.या शोभायात्रेत समाजबांधवांनी राष्ट्रीय देखावे सादर केलेत.शोभायात्रेनंतर निमवाडी परिसरातील गणपत शर्मा संस्कृत विद्यालयात जयंती कार्यक्रम व देखावेकारांचा गौरव संपन्न झाला. उत्कृष्ट देखावे व कार्यक्रम सादर करणाऱ्यांचा गौरव करण्यात आला. संचालन व आभार भरत मिश्रा यांनी केले. कार्यक्रमानंतर आयोजित महाप्रसादाचा समाजबांधवांनी लाभ घेतला. यावेळी संयोजक रवीकुमार मिश्रा, राजस्थानी ब्राह्मण समाजाचे अध्यक्ष संजय शर्मा नर्सरी, अ.भा. महाराष्ट्रीयन ब्राह्मण समाजाचे उदय महाजन, डॉ. अभिजित लऊळ, गुजराती ब्राह्मण समाज अध्यक्ष हितेश मेहता, उत्तर भारतीय ब्राह्मण समाजाचे विष्णुदत्त शुक्ला, मोहन पांडे, अशोक शर्मा, विजय तिवारी, सिद्धार्थ शर्मा, अॅड. सत्यनारायण जोशी, शैलेश व्यास, राजेंद्र तिवारी, दीपक शर्मा,श्याम पचोरी, राधेशाम शमर्आ,सुभाष देशपांडे, पराशर ब्रह्मन् सेवा संघाचे नंदू सोपले, अविनाश देव, अमोल पाटील, देवकाका, नितीन रेलकर, कालिशंकर अवस्थी, लक्ष्मीकांत दुबे, डॉ. प्रमोद शुक्ला, डॉ. कमल मिश्रा, प्रीतेश खोत, अरुण शर्मा, अनुप शर्मा, शिवकुमार इंदोरिया, नगरसेवक राजेश मिश्रा, विष्णू तिवारी, गौरव देशपांडे, राजेश्वरी अम्मा शर्मा, दीपक मायी, भावेश शुक्ला उपस्थित होते.
शहरात ‘जय परशुराम’चा जयघोष!
By admin | Published: April 28, 2017 2:03 AM