अकोला : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी) मध्ये कोरोना रुग्णांसाठी आणखी ६० खाटा वाढविण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. त्यानुसार खाटा वाढविण्याची तयारी ‘जीएमसी’ प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे.
जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढत असून, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आणि मृत्यूंची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोविड कक्षात दाखल होणाऱ्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, खाटांची कमतरता भासत आहे. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोविड कक्षात कोरोनाबाधित रुग्णांसाठी ६० खाटा वाढविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत. त्यानुसार ६० खाटा वाढविण्याची तयारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनामार्फत शुक्रवार, १६ एप्रिलपासून सुरू केली आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणखी ६० खाटांची व्यवस्था होणार आहे.