काँग्रेससाठी सध्या चांगले दिवस - बाबासाहेब धाबेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 02:10 AM2018-02-12T02:10:48+5:302018-02-12T02:10:59+5:30
अकोला : सर्वसामान्य नागरिकांची भाजप प्रती निर्माण झालेली नाराजी लक्षात घेता, भाजपपेक्षा काँग्रेससाठी सध्या चांगले दिवस आहेत, असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ माजी मंत्री बाबासाहेब धाबेकर यांनी व्यक्त केले. त्यांच्या वाढदिवसाच्या नियोजनासाठी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी पत्रकारांशी रविवारी औपचारिक संवाद साधला. देश आणि राज्याच्या राजकीय परिस्थितीवर विश्लेषण करताना त्यांनी उपरोक्त संवाद साधला.
लोकमत न्यूज नेटवर्क

भाजप आणि शिवसेनेत वाढणारा दुरावा आणि स्थिती पाहता महाराष्ट्रातील आगामी निवडणुका दोघेही स्वबळावर लढणार असल्याचे संकेत आहेत. भाजपने घेतलेल्या काही निर्णयांमुळे सर्वसामान्य जनता त्रासली आहे, नागरिकांमध्ये भाजप प्रती निर्माण झालेली नाराजी काँग्रेसच्या पथ्यावर पडू शकते. त्यामुळे आगामी निवडणुका कॉंग्रेससाठी चांगले दिवस येणारे असू शकतात. काँग्रेस-राष्ट्रवादीने तशी मोर्चेबांधणी करण्याची गरज आहे, असेही ते बोललेत. मत वळविण्याची ताकद आजही भारिपच्या अँड. प्रकाश आंबेडकर यांच्यात आहे. त्यांचा स्वाभिमान जपून जर आगामी निर्णय काँग्रेसने घेतले, तर चांगले दिवस येऊ शकतात, असेही बाबासाहेब धाबेकर बोललेत.