शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

अकाेलेकरांसाठी खुशखबर; रस्त्यांवर धावणार इलेक्ट्रिक बसेस, शासनाने दिली मंजूरी

By आशीष गावंडे | Published: November 06, 2023 8:52 PM

आ.सावरकर यांचा पाठपुरावा

अकोला: केंद्र व राज्य सरकारने राज्यातील निवडक शहरांमध्‍ये सार्वजनिक वाहतुकीसाठी इलेक्ट्रिक बसेस चालविण्‍याचा निर्णय घेतला असून साेमवारी अकाेला शहरासाठी ५० बसेस मंजूर करण्‍यात आल्‍याची माहिती आहे. महापालिकेची बस सेवा खंडित झाल्यानंतर भाजपचे आमदार रणधीर सावरकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे इलेक्ट्रिक बसेस मंजूर करण्यासाठी सातत्याने पत्रव्यवहार केला. दरम्यान, दिवाळीच्या ताेंडावर बसेस मंजूर झाल्या असून हा अकाेलेकरांसाठी माेठा दिलासा मानला जात आहे. 

महापालिकेची सप्टेंबर २००१ मध्ये स्थापना झाल्यानंतर सन २००३ मध्ये शहरवासियांसाठी पहिल्यांदा शहर बस वाहतूक सेवा सुरु करण्यात आली हाेती. ही सेवा २०१० पर्यंत सुरळीत सुरु हाेती. कालांतराने कंत्राटदाराची संस्था अवसायनात निघाल्यामुळे ही सेवा बंद पडली. त्यानंतर थेट २०१७ मध्ये तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी बस सेवा सुरु करण्याचा कंत्राट श्रीकृपा ट्रॅव्हल्सला दिला. कंत्राटदाराने २० बसेस सुरु केल्यानंतर ऑटाे चालकांनी भाड्यात कपात करुन प्रवासी पळविण्याचा सपाटा लावला हाेता. परिणामी श्रीकृपा ट्रॅव्हल्सचे दिवाळे निघाले आणि ही बस सेवा बंद करण्याची नामुष्की ओढवली. सन २०२० पासून ही सेवा ठप्प पडून आहे. यामुळे सर्वसामान्य अकाेलेकरांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. 

चार्जिंग स्टेशनसाठी अनुदानइलेक्ट्रिक बस सुरू झाल्यानंतर इंधनावरील खर्चात बचत होण्यासाेबतच शहराचे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. राज्य सरकारच्या शिफारशीनंतर केंद्र सरकारने ई-बसेस मंजूर केल्‍यानंतर प्राधान्‍याने ई-बसेससाठी चार्जिंगची व्‍यवस्‍था उभारली जाणार आहे. यासाठी केंद्रामार्फत किमान आठ ते दहा काेटी रुपये अनुदान प्राप्त हाेण्याची शक्यता आहे. वाहनांच्या देखभालीचा खर्च मनपा प्रशासनाला करावा लागेल.

टॅग्स :Akolaअकोलाelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर