रब्बी हंगामात घेतल्या जाणार्या पिकांपैकी हरभरा हे एक महत्त्वाचे कडधान्य पीक असून, या पिकाच्या व्यवस्थापनाबाबत डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि रिलायन्स फाऊंडेशनतर्फे २१ डिसेंबर रोजी शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. त्यांच्या सोबतच कीटकशास्त्रज्ञ डॉ. प्रेमा चिकटे यांनीदेखील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यामध्ये प्रामुख्याने खतांची मात्रा, आंतरमशागत, पीक संरक्षण, पाणी व्यवस्थापन आदी विविध घटकांविषयी माहिती देण्यात आली. जिरायत हरभरा क्षेत्रात जमिनीतील ओलावा खूपच कमी असेल आणि एखादे पाणी देणे शक्य असेल तर हरभरा पिकाला फुले येऊ लागताच पाणी द्यावे. बागायत हरभरा शेताची रानबांधणी करताना दोन साऱ्यातील अंतर कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न करावा. तसेच लांबीसुध्दा जमिनीच्या उतारानुसार कमी ठेवावी म्हणजे पिकाला प्रमाणशीर पाणी देण्यास सोईचे होते. मध्यम जमिनीत २० ते २५ दिवसांनी पहिले, ४५ ते ५० दिवसांनी दुसरे आणि ६५ ते ७० दिवसांनी तिसरे पाणी द्यावे. जमिनीच्या खोलीनुसार पाण्याच्या दोन पाळ्यांमध्ये अंतर ठेवावे. जमिनीस फार मोठ्या भेगा पडू देऊ नयेत. एक पाणी दिल्यास ३० टक्के, दोन पाणी दिल्यास ६० टक्के आणि तीन पाणी दिल्यास उत्पादनात दुप्पट वाढ होते. कीड व्यवस्थापन अंतर्गत घाटे आगीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एचएनपीव्ही या जैविक विषाणूचा उपयोग केल्यास उत्तम परिणाम साधता येतो. यासोबतच अनेक उपाय योजनेबाबत शेतकर्यांना सखोल मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन विलास सवाणे यांनी केले. त्यांना परभणी येथील सुमित मातीकाळे यांनी सहकार्य केले.
तंत्रज्ञानाची जोड दिल्यास कोरडवाहूतही चांगले उत्पादन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 4:15 AM