लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: वस्तु व सेवा कर (जीएसटी) हा ग्राहक, व्यापारी आणि देशासाठी हिताचा आहे, हा कायदा व्यवस्थितपणे समजून घ्यावा. कुणीही गोंधळून जाऊ नये. अडचणी असल्यास त्या निश्चितपणे सबंधित विभागाला कळविल्या जातील, असा दिलासा जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी दिला.नियोजन सभागृहात आयोजित वस्तु व सेवा कर मार्गदर्शन कार्यशाळेत ते बोलत होते. या प्रसंगी चंद्रपुरचे राज्य कर उपायुक्त सुनील लहाने, अकोल्याचे राज्य कर उपायुक्त सुरेश शेंडगे, आनंद गावंडे, सहायक आयुक्त रमेश दळवी, विदर्भ चेम्बर्स आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष विजय पांम्पलिया, सनदी लेखापाल संघाचे अध्यक्ष संजय टेकाळे, कर सल्लागार मंडळाचे अध्यक्ष कैलास लोहिया आदींसह मोठया प्रमाणात उद्योजक, व्यापारी नागरिक उपस्थित होते.वस्तु व सेवा कराबाबत विस्तृत माहिती होण्यासाठी तसेच या कराविषयी ग्राहक व व्यापाऱ्यांचा संभ्रम दूर होण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.जिल्हाधिकारी म्हणाले की, व्यवहारात सुरळीतपणा व पारदर्शीपणा येण्यासाठी वस्तु व सेवा कराची निर्मिती करण्यात आली आहे. सर्वांच्या हिताचा विचार करुनच हा कर लागू करण्यात आला आहे. यामध्ये ग्राहक किंवा व्यापाऱ्यांचे अजिबात नुकसान नाही. या कराची व्याप्ती समजून घेतल्यास बरेच संभ्रम दूर होतील. या कराबाबत इंटरनेटवर सविस्तरपणे माहिती उपलब्ध आहे. यु-टुयूबवर डॉ. विकास दिव्यकिर्ती यांनी वस्तु व सेवा कर बाबत सविस्तर मार्गदर्शन केले आहे. तीन भागात असणारे हे मार्गदर्शन पाहिल्यास या कराबाबतच्या शंका निश्चितपणे दूर होतील, असेही यावेळी जिल्हाधिका?्यांनी सांगितले. वस्तु व सेवा करबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी उद्योजक व व्यापाऱ््यांच्या अडचणी जाणून घेतल्या. या अडचणी शासनाला कळविल्या जातील, असे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे या कराबाबतचे संभ्रम दूर करण्यासाठी अकोला जिल्हयाकरीता नियुक्त करण्यात आलेले संबधित विभागाचे अधिकारी यांचा ई-मेल ‘वसुंधरा डॉट सिन्हा अॅट जीओव्ही डॉट ईन ’या पत्त्यावर मेल करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. यावेळी व्यापारी, उद्योजकांनी अनेक प्रश्न मांडले, त्यावर जिल्हाधिकारी आणि लहाने यांनी समाधानकारक उत्तरे दिली.
वस्तु व सेवा कर सर्वांसाठी हिताचा!
By admin | Published: July 17, 2017 6:53 PM