अकोला : भारतीय कापूस (सीसीआय)महामंडळाचा राज्यातील जीनिंग संचालकासोबत अद्याप करार झाला नसल्याचे वृत्त असल्याने यावर्षी शासकीय कापूस खरेदीचे चित्र अनिश्चित आहे. दरम्यान, खासगी बाजारात या आठवड्यात कापसाचे दर प्रतिक्ंिवटल ५,९०० पर्यंत वाढल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.राज्यातील कापूस पट्ट्यात वेचनीला सुरू वात झाली असून,बाजारात कापसाची आवक वाढली आहे.परंतु सुरू वातीला आर्द्रता तसेच प्रतवारीचे निकष लावून बाजारात कापूस खरेदी केली जात असल्याने दर घटले होते.त्यामुळे शासकीय कापूस खरेदीकडे शेतकºयांचे लक्ष लागले होते. तथापि कापूस खरेदी सुरू झाली नाही. एवढयात ही केंद्र सुरू होण्याची शक्यताही नाही. सीसीआयकडे कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी राज्यात स्वताची जागा उपलब्ध नसल्याने स्थानिक जिनींग संचालकासोबत करार करणे गरजेचे आहे.परंतु अद्याप जागेसाठी करारनामे झाले नसल्याने सीसीआयसोबतच महाराष्टÑ राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाचा कापूस खरेदीचा मुहूर्त लांबणीवर पडला आहे.दरम्यान,सुरू वातीला कापसाचे दर कमी झाल्याने शेतकºयांची चिंता वाढली होती तथापि या आठवड्यात हे दर प्रतिक्विंटल ५,५०० ते ५,९०० रू पयांपर्यंत वाढल्याने शेतकºयांना दिलासा मिळाला आहे.आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कापसाचा तुटवडा व देशातंर्गत कापसाची गरज बघता कापसाचे दर आणखी वाढण्याची शक्यता व्यापारी वर्तुळात वर्तविण्यात येत आहे.
सीसीआयने कापूस खरेदी सुरू केल्यानंतरच ‘पणन‘ला राज्यात कापूस खरेदी केंद्र सुरू करता येतील.पण सीसीआयचे जिनींग संचालकासोबत जागेसंदर्भात करारनामे झाले नाही.सीसीआयची खरेदी सुरू झाल्यावर ‘पणन’खरेदी सुरू करेल.प्रसेनजीत पाटील,प्रदेश उपाध्यक्ष,महाराष्ट्र राज्य सहारी कापूस उत्पादक पणन महासंघ,बुलडाणा.