अकोला : शासकीय हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्यासाठीचा आदेश प्राप्त झाला आहे. राज्यातील जिल्ह्यांची उत्पादकताही ठरली असून, अकोला जिल्ह्याची उत्पादकता हेक्टरी १३ क्ंिवटल ठरली आहे.‘कोरोना’ विषाणूचा प्रसार रोखण्यासाठीचा ‘लॉकडाऊन’ संपताच हरभरा खरेदी केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत.यावर्षी केंद्र शासनाने हरभरा (चणा) पिकाला प्रति क्ंिवटल ४ हजार ८७५ रुपये हमीदर जाहीर केले; पण शासकीय खरेदी केंद्रे सुरू केली नसल्याने शेतकऱ्यांना हमीपेक्षा १ हजार २५ रुपये कमी दराने शेतकऱ्यांना व्यापाºयांना हरभरा विक्रीची पाळी आली आहे. रब्बी हंगामात राज्यात २२.८९ लाख हेक्टरवर हरभरा पेरणी करण्यात आली आहे. यावर्षी अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती जिल्ह्यात ५ लाख १४ हजार ७७५ हेक्टर १२९ टक्के हरभºयाची पेरणी झाली. सद्यस्थितीत शेतकºयांना पैशांची नितांत गरज असल्याने हरभरा विक्रीची घाई सुरू आहे. सध्या कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी अकोला जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत्यासह राज्यातील बहुतांश बाजार समित्या बंद आहेत. त्यामुळे शेतमाल खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद आहेत. ३१ मार्चपर्यंत बाजार समित्या बंद राहणार आहेत. त्यानंतर काय निर्णय होतो, याकडे शेतकºयांचे लक्ष लागले आहे.अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती २१ मार्च रोजी बंद करण्यात आली. त्या दिवशी ३,११० क्ंिवटल हरभरा खरेदी करण्यात आला. तात्पुरती सरासरी ३ हजार क्ंिवटलची आवक सुरू होती. येथे प्रति क्विंटल सरासरी दर ३,८५० रुपये दर आहेत;परंतु प्रतवारीच्या निकषानुसार व्यापारी हरभरा खरेदी करीत असून, हे दर प्रति क्विंटल ३,२०० रुपये आहेत. चांगल्या वाळलेल्या पिवळ्या हरभºयाला ३,९०० रुपये दर देण्यात आले. सद्यस्थितीत सर्वच डाळवर्गीय पिकांचे दर कमी झाले आहेत. शासनाने शेतकºयांशी संबंधित कृषी निविष्ठा विक्रेत्यांना प्रतिष्ठाने सुरू करण्याची संचारबंदीतून सूट दिली आहे. दरम्यान, लवकरच हरभरा खरेदी केंद्रे सुरू केली जाणार असल्याची माहिती फेडरेशनच्या सूत्राने दिली.
शासकीय हरभरा खरेदी केंद्रे सुरू होणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 5:59 PM